‘देवमाणूस’ मालिकेतील मंजुळा खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टयलिश, सुरु केलाय पुण्यात नवीन बिसनेस..

झी मराठी वाहिनीवरून प्रसारित होणारी देवमाणूस मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. या मालिकेतील सर्वच पात्रे कमालीची भूमिका पार पाडतात. या मालिकेतील मंजुळाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मूळ नाव प्रतीक्षा जाधव आहे. तिला या मालिकेतून प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. प्रतीक्षा जाधव या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे.

अभिनेत्री प्रतीक्षा जाधव मराठी नाटक मालिका चित्रपट याखेरीज हिंदी मालिका तसेच दक्षिणात्य चित्रपटातूनही तिने काम केले आहे. प्रतीक्षा मूळची पुण्याची असलेल्याने प्रतिक्षाने कॉलेजमध्ये असताना नाटकांमधून काम केले आहे. ‘चला खेळ खेळूया दोघे’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रतिक्षाने मराठी चित्रपट सृष्टीत आपले पहिले पाऊल टाकले.

‘छोटी मालकीण, मोलकरीण बाई, मेंदीच्या पानावर, दिल्या घरी तू सुखी रहा’ या मालिका तसेच चला ‘खेळ खेळूया दोघे, तात्या विंचू लगे रहो, जखमी पोलीस, भुताचा हनिमून, सौभाग्य माझे दैवत, खेळ आयुष्याचा’ हे मराठी चित्रपटांमध्ये देखील तिने भूमिका साकारलेल्या आहे. ‘क्राइम पेट्रोल’ या हिंदी मालिकेत सोबत दक्षिण चित्रपटाचाही ती एक महत्त्वाचा भाग बनली आहे.

प्रतीक्षा केवळ अभिनेत्री नसून, पुण्यात तिचा स्वतःचा व्यवसाय देखील आहे. मांजरी रोड, हडपसर, पुणे येथे “APPLE” नावाने तिचे स्वतःचे वूमन सलून आहे. या व्यवसायात तिची भरभराट होताना दिसत आहे. अभिनयासोबतच आपला स्वतःचा एखादा बिजनेस असावा असे प्रतिक्षाला नेहमी वाटत होते. ऍपलच्या माध्यमातून तिची ही ईच्छा आता पूर्ण झालेली पाहायला मिळते आहे.

अभिनेत्री प्रतीक्षा जाधव सध्या झी युवा वाहिनीवरील ‘तुझं माझं जमतंय’ मालिकेत काम करत आहे. या मालिकेतून ती पम्मीच्या दमदार भूमिकेत पाहायला मिळत आहे. ही भूमिका तिच्याकडे ओघानेच आली, असे म्हणायला हरकत नाही. कारण पम्मीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या रात्रीस खेळ चाले ३ मालिकेत शेवंताची भूमिका गाजवत आहे.

दरम्यान, त्यामुळे अपूर्वाने ‘तुझं माझं जमतंय’ ही मालिका पुढे न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रतीक्षाकडे ही भूमिका ओघानेच आलेली पाहायला मिळाली आहे. अपूर्वाने रंगवलेली पम्मी प्रतीक्षा जाधव देखील तितक्याच ताकदीने साकारत आहे हे तिच्या अभियावरून लक्षात येते. प्रतीक्षा जाधवने खूप कमी काळातच देवमाणूस मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.