प्राजक्ता माळी अडकणार विवाहबंधनात? ठरला जानेवारी २०२२ चा मुहूर्त…

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत बरीच लगबग पाहायला मिळत आहे. अर्थात ही लगबग लग्नाची आहे. यंदा अनेक मराठी कलाकारांनी बोहल्यावर चढत आपल्या आयुष्यातील नव्या भूमिकेला सुरुवात केली आहे. त्यातच आता अजून एका अभिनेत्रीची भर पडणार असल्याचं चित्र आहे. सध्या अवघ्या महाराष्ट्राची क्रश बनलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी लवकरच बोहल्यावर चढणार आहे. येत्या जानेवारीमध्ये हा भव्य लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

वाटलं ना आश्चर्य? अहो, प्राजक्ता माळी काही खऱ्या आयुष्यात बोहल्यावर चढणार नाहीये. तर तिच्या नव्या चित्रपटात ती आपल्याला नवरीच्या रूपात दिसणार आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती आपल्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर सात फेरे घेताना दिसत आहे. मात्र हा एक ऍनिमेटेड व्हिडिओ आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता अंकुश चौधरी एका नव्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहेत.

या व्हिडिओ बरोबरच प्राजक्ताने आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर देखील शेअर केले आहे. ‘लक डाऊन- बी पॉझिटिव्ह’ असे तिच्या या आगामी चित्रपटाचे नाव आहे. कॅप्शन मध्ये प्राजक्ताने या चित्रपटाविषयी अधिक माहिती दिली आहे. २८ जानेवारी २०२२ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. “मी या चित्रपटाची खूप आतुरतेने वाट पहात आहे. लॉकडाऊनच्या काळात लकडाऊनची बाजी, २८ जानेवारी ला येतोय अंकुश, प्राजक्ता होणार का राजी?” अशी कॅप्शन तिने दिलेली पाहायला मिळते. या चित्रपटात प्राजक्ता आणि अंकुशची रोमँटिक वेडींग जर्नी अनुभवायला मिळणार आहे.

प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरीचा हा पहिलाच एकत्र चित्रपट आहे. प्रेक्षक या जोडीला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे रंजक ठरणार आहे. नुकताच ३ डिसेंबरला प्राजक्ताचा ‘पांडू’ हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला पाहायला मिळत आहे. ३१ डिसेंबरला तिचा ‘पावनखिंड’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

प्राजक्ताने अलीकडेच तिचे स्वतःचे प्रॉडक्श्न हाऊस सुरू केले आहे. ‘शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ असे तिच्या निर्मितीसंस्थेचे नाव आहे. या निर्मितीसंस्थेद्वारे लवकरच ‘फुलवंती’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. प्राजक्ताने स्वतःच या गोष्टीची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून दिली होती. त्या आधी तिने आपला ‘प्राजक्त प्रभा’ नावाचा कवितासंग्रहही प्रकाशित केला होता.