मराठमोळा श्रेयस बनला एअरपोर्टवर पुष्पा! पुष्पाच्या आवाजासाठी प्रेक्षकांनी केली मागणी..पहा विडिओ

साऊथ इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन यांचा नुकताच ‘पुष्पा’ हा चित्रपट रिलीज झाला. त्यानंतर आजच्या दिवसापर्यंत सगळीकडे त्याचीच चर्चा रंगली आहे. मग ते पुष्पा या चित्रपटातील गाणी असो किव्हा त्यातील डायलॉग! या सगळ्या गोष्टी सोशलमीडियावर खूप धुमाकूळ घालत आहेत. पुष्पा हा चित्रपट मुळात तेलगू आणि तामिळ चित्रपट आहे. अन्य भाषेत डबिंग करून प्रदर्शित केल्यानंतर देखील हा चित्रपट खूप सुपरहिट ठरला. आणि हिंदी भाषेत डबिंग केल्यानंतर तर लोकांनी आकर्षशः डोक्यावर या चित्रपटाला घेतले. कोणताही चित्रपट डबिंग करायचा म्हंटल तरी… मेकर्स व्हॉइस ओव्हर आर्टिस्टची मदत घेत असतात. परंतु पुष्पा या चित्रपटातील आवाजाची व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून अभिनेता श्रेयस तळपदे यांची निवड झाली. खूप लोकांना हे माहीत नाही की अभिनेता श्रेयस तळपदे यांनी पुष्पा या चित्रपटासाठी आवाज दिला आहे. त्यांनी याबद्दलचा लाईव्ह पुरावा देखील दिला आहे ज्यामध्ये हे स्पष्ट झाले आहे.

View this post on Instagram

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

नुकताच अभिनेता श्रेयस तळपदेने एअरपोर्टवर पुष्पा मधील एक गाजलेला डायलॉग ऐकून दाखवला. त्यांचा एअरपोर्टवरील हा व्हिडीओ सध्या सोशलमीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सध्या नेटवर खूपच धुमाकूळ घातली आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर श्रेयस तळपदेचा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मराठी हिंदी अभिनेता श्रेयस तळपदे पुष्पा चित्रपटातील गाजलेला डायलॉग ‘पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या, फायर है  मै’ हा डायलॉग बोलताना दिसत आहे. त्याच्या आवाजातील बेस हा प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. चाहते अभिनेता श्रेयस तळपदेच्या या नव्या कलेबद्दल खूप खुश आहेत. व्हिडिओ करणारा व्यक्ती सुद्धा त्याच्या आवाजामुळे खुश झाला आहे हे तुम्हाला समजले असेल.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या व्हिडिओ वर भन्नाट मित्रा गाजवलंस, भाई भाई!!, कडक भाई, फायर भाई अशा अनोख्या आणि भन्नाट कमेंट करताना फॅन्स दिसत आहेत. अल्लू अर्जुनच्या प्रत्येक चित्रपटाला व्हाईसओवर आर्टिस्ट संकेत म्हात्रे यांचा आवाज असतो. परंतु यावेळी पुष्पा या चित्रपटासाठी अभिनेता श्रेयस तळपदे यांची निवड करण्यात आली आणि त्यांचा आवाज पुष्पा या चित्रपटासाठी देण्यात आला. अभिनेता श्रेयस यांचा आवाज इतका चपखल बसला की खुद्द अल्लू अर्जुन देखील यांनी एका कार्यक्रमादरम्यान त्यांचे जाहीर आभार मानले.