कौतुकास्पद! मराठमोळी अभिनेत्री दिपाली सय्यदने पूरग्रस्तांना तब्बल १० कोटींची मदत..

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना महापुराचा फटका बसल्याने अनेक घरे कुटुंब उध्वस्त झाली आहेत. अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि दरड दुर्घटनेत रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये मोठं नुकसान झालं. त्यानंतर अनेक मंत्र्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्तांना पुनर्वसनासाठी निधी देण्याचं जाहीर केले आहे. त्यानंतर आता मराठमोळी अभिनेत्री दिपाली सय्यदने पुढाकार घेवून भोकरदनला भेट दिली. पाहणी केल्यानंतर पूरग्रस्तांना तब्बल 10 कोटींचा निधी मदत म्हणून जाहीर केला आहे.

या महापुरामुळे प्रचंड जीवित व वित्त हानी झाली आहे. कित्येक संसार उध्वस्त झाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरात नागरिकांचे मोठे नुकसान झालं आहे. राज्य सरकारने तातडीने मदत जाहीर केली. व्यापाऱ्यांना 10 हजार व सामना खरेदीसाठी 5 हजार अशी 15 हजारांची मदत जाहीर केली आहे.

अभिनेत्री आणि शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या दिपाली सय्यद यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील भोकरदन या गावाला भेट दिली. त्यावेळी त्या म्हटल्या की, “भयंकर आहे सगळं. जेव्हा प्रत्येकाशी मी बोलत होते, तेव्हा अंगावर काटा येत होता. छत नाही, संसार उघडे पडले आहेत. प्रत्येक घराघरात एकच चित्र आहे. दोन वर्षापूर्वीही असंच झालं होतं. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, चिपळूण अशा भागात मोठं नुकसान झालं आहे.” असे त्या म्हटल्या आहेत

त्यानंतर त्या म्हतल्या की, “मी हे चित्र डोळ्याने बघितलं आहे. काहीच उरलं नाहीय. दोन वर्ष कोरोना महामारीत गेलंय. कामधंदा बंद आहे. त्यात निसर्गाचा प्रकोप आहे. गावच्या गावं उद्ध्वस्त झालं आहे. काही उरलं नाही. हे बघाताना भयानक वाटलं. देव किती परीक्षा घेणार? स्ट्राँग आहे म्हणून अजून किती परीक्षा द्यायच्या. कोरोना येतोय, पूर येतोय” असे दिपाली सय्यद यांनी म्हटले आहे.

दरम्यान, दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड पूरग्रस्त भागातील लोकांच्या पुनर्वसनासाठी त्यांच्या घरबांधणीसाठी दहा कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. दिपाली सय्यद यांनी पूरग्रस्तांसाठी तब्बल 10 कोटींची मदत जाहीर केली असून, त्यांचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक केले जात आहे.