‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील मायराच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर! आईने शेअर केली भावुक पोस्ट…

झी मराठी वाहिनी वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. यातील परी म्हणजेच बालकलाकार मायरा वायकुळने आपल्या पदार्पणातील भूमिकेनेच प्रेक्षकांना आपलेसे करून घेतले आहे. बघता बघता परी सगळ्यांचीच लाडकी बनली. झी मराठी पुरस्कार सोहळ्यात तिला ‘उत्कृष्ट बालकलाकार’ हा पुरस्कारही मिळाला. मात्र सध्या तिच्यावर आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याचे चित्र आहे.

गेल्या महिन्यातच तिच्या आईच्या वडिलांचे म्हणजेच मायराच्या नाना आजोबांचे नि’ध’न झाले. मायराच्या आईने म्हणजेच श्वेता वायकुळ यांनी याबाबतची बातमी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट वरून दिली. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांबरोबरचे अनेक गोड आठवणींचे फोटो शेअर केले. तसेच कॅप्शन मध्ये त्यांनी अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shweta G Vaikul (@shwetavaikul)

आपल्या पोस्टमध्ये श्वेता लिहितात, “…आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे… माहिती नाही तुमच्याशिवाय मी पुढचं आयुष्य कसं जगेन. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला कॉल करून विचारायचे. प्रत्येक सुखात-दुःखात तुम्ही माझ्या सोबत होता. तुमच्याशिवाय कसं सामोरं जाऊ प्रत्येक गोष्टीला काहीच कळत नाही. कोण येईल आता माझ्या एका कॉल वर मला भेटायला… खूप खूप आठवण येते पप्पा. का गेलात तुम्ही… तुमच्याशिवाय जगायची सवय नाही हो मला…”

स्वतःची काळजी न करता दुसऱ्यांसाठी जगत राहणारे, सकारात्मक विचार करणारे, नेहमी प्रसन्न राहणारे असे मायराचे आजोबा होते. त्यांचे गुण मायरामध्ये उतरले असून त्याचा मला अभिमान आहे, असेही श्वेता यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे. ते अचानक निघून गेल्याने बरंच काही बोलायचं राहून गेल्याचंही श्वेता यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. मायराचे आजोबा असताना त्यांनी कधीच कसली कमी पडू दिली नाही, अशा भावुक शब्दांमध्ये श्वेता यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

मायराच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट वरूनही एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मायरा आपल्या आजोबांच्या पाठीवर बसून घोडा घोडा खेळत असल्याचे दिसते. या व्हिडिओ वरही अतिशय हळवी कॅप्शन देण्यात आली आहे. आजोबांच्या जाण्याने मायरा आणि तिचे कुटुंब दुःखसागरात बुडून गेले आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Myra Vaikul (@_world_of_myra_official)

मायराच्या आजोबांच्या जाण्याने मायराच्या कुटुंबियांच्या आयुष्यात भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. मायराच्या आजोबांच्या आत्म्याला शांती लाभो आणि मायराच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच देवाकडे प्रार्थना…