या मोठ्या दोन कारणामुळे सलमान खानने केले नाही अजून लग्न, स्वतः केला खु’लासा..

बॉलिवूडमध्ये नवीन नवीन येणारे चेहरे सुद्धा लवकर लग्न करून सेटल होताना दिसत आहेत. मात्र इतक्या वर्षांत सलमान खानच्या हाताला मात्र हळद लागलेली नाही. त्याच्याबरोबर इंडस्ट्रीमध्ये आलेल्या कलाकारांना आता लग्न होऊन आज त्यांची मुले लग्नाला आली आहेत. सलमानच्या डोक्यावर मात्र अजून अक्षता पडलेल्या नाहीत. दबंग खान सोबत लग्न करायला लाखो मुली एका पायावर तयार आहेत. तरीही सलमानचे लग्न न होण्यामागे काय कारण असेल बरं…?

एकदा सलमानने स्वतःच यावर खुलासा केला होता. त्यावेळी त्याच्यावर पोलीस केसेस सुरू होत्या. मुंबई आणि जोधपूर अपघाताच्या त्या केसेस होत्या. सलमानने यावेळी सांगितले होते, की आम्हाला या केसेस जिंकण्याची पूर्ण खात्री आहे. मात्र देव न करो आणि मला शि’क्षा झालीच तर… काय होणार? असे असताना मी मी लग्न करणे योग्य ठरेल का? आपला पती जे’ल’मध्ये आहे आणि २, ३ किंवा ५ वर्षांची बाळं आपल्या वडिलांना भेटण्यासाठी आतुर आहेत… हे खूप अयोग्य आहे. त्यामुळे ही के’स सुटली तरच लग्नाचा विचार करता येईल.

सलमान खानचे वडील सलीम खान यांनी एकदा गमतीत म्हटले होते, की तुम्ही मला इतर कोणतेही प्रश्न विचारू शकता. पण सलमानलग्न कधी करणार हे विचारू नका. कारण याचे उत्तर मलाच माहीत नाही. त्यांनी सलमानच्या जवळपास ठरलेल्या लग्नाचा एक किस्साही शेअर केला होता. सलमानसाठी लग्नाची स्थळे येत नाहीत असे नाही. एकदा तर लग्नापर्यंतच्या सर्व गोष्टी फायनल झाल्या होत्या. मात्र त्याच्या आईला एक गोष्ट ख’ट’कली. त्यामुळे ते लग्न होऊ शकले नाही. लग्न होता होता राहून गेले. ही खूप जुनी गोष्ट आहे. सलमानचा हा वैयक्तिक प्रश्न असल्याने यावर तोच योग्य उत्तर देऊ शकतो, असेही ते म्हणाले.

सलमान खानचा खास मित्र साजिद नाडियादवालाने ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये सलमानच्या लग्नाबद्दलचा एक किस्सा शेअर केला होता. त्याने सांगितले, की मला तर दुसरे लग्न करायचे नव्हते. मात्र सलमानच्या हट्टामुळेच मला दुसरे लग्न करावे लागले. खरंतर लग्न करण्याची इच्छा सलमानची होती. आम्ही खूप जवळचे मित्र आहोत त्यामुळे आम्ही एकाच दिवशी एकाच ठिकाणी लग्न करायचे ठरवले होते. सलीम खान यांच्या वाढदिवसादिवशी हे लग्न करायचे ठरले होते. मात्र लग्नाच्या काही दिवस आधीच माझा लग्न करायचा मूड नाही असं म्हणत सलमान मागे हटला. मी मात्र मागे हटू शकलो नाही.