लकडी की काठी काठी का घोडा गाजलेल्या गाण्यामधील मिनी आता दिसतात अश्या..? करतात हे काम.

जेव्हा जेव्हा जुने चित्रपट आणि जुनी गाणी यांचा विषय निघतो तेव्हा आत्ताच्या दशकांमधील चित्रपट गाण्यापेक्षा जुनी गाणी आणि चित्रपट दमदार ठरतात. त्यापैकीच सुपरहिट गाणं तुम्हाला नक्कीच आज देखील आवडत असेल त्या गाण्याचे बोल आहेत ‘लकडी की काठी काठी का घोडा..’ हे गाणं लोक आजदेखील आवडीने ऐकत असतात. हे लोकप्रिय गाणं १९८३ मधील मासूम या चित्रपटातील आहे. या सुप्रसिद्ध गाण्यात तुम्हाला जुगल हंसराज, उर्मिला मातोंडकर आणि आराधना श्रीवास्तव हे बालकलाकार दिसले होते.

१९८३ मध्ये रिलीज झालेला चित्रपट मासू यामध्ये उर्मिला मातोडकर यांनी पिंकी तर आराधना श्रीवास्तव यांनी मिनीची भूमिका साकारली होती. मासूम या चित्रपटाला प्रदर्शित होऊन सुमारे ३८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटातील कलाकार उर्मिला मातोंडकर आणि जुगल हंसराज आज देखील त्यांच्या अभिनयातून आणि राजकारणातून लोकांसमोर सतत रहात असतात.
उर्मिला मातोंडकर या सतत प्रेक्षकांसमोर राहत असतात पण मिनीची भूमिका साकारणारी आराधना श्रीवास्तव ती चित्रपटातून सध्या गायब आहे. मासूम चित्रपटातील मिनी म्हणजेच आराधना श्रीवास्तव ही बालकलाकार म्हणून सर्वांना चांगलीच माहित आहे. मासूम या चित्रपट व्यतिरिक्त आराधना श्रीवास्तव यांनी खुदा हाफिज, राम तेरे कितने नाम यांसारख्या नावाजलेल्या चित्रपटात देखील काम केली आहेत. त्यामुळे तिच्यावर चाइल्ड आर्टिस्टचा शिक्का मोर्तब करण्यात आला.

View this post on Instagram

A post shared by Yash (@thatindiancinephile)

बॉलीवूड मधील असे खुप सारे बाल कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या लहान वयात खूप सारी लोकप्रियता मिळवून मोठेपणी बॉलिवुड जगताला निरोप ठोकला आहे. परंतु यशाच्या शिखरावर असताना देखील मासूम चित्रपटातील मिनी म्हणजेच आराधना श्रीवास्तव यांनी दोन-तीन चित्रपटानंतर बॉलिवूडला रामराम ठोकला त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की त्यांनी दोन तीन चित्रपटानंतर आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी कानपूर येथे जाऊन पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी पुण्यातील सिम्बॉइसिस कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. आयटी मध्ये त्यांनी काही काळ नोकरीही केली. आराधना श्रीवास्तव यांना आधीपासूनच गायनाची देखील खूप आवड होती म्हणून त्यांनी मास्टर पीएचडी केली.

source:lokmat

आराधना श्रीवास्तव विवाहित आहेत त्यांना पाच वर्षाची मुलगी यशेता आहे. तिला कधीकधी खुश करण्यासाठी आराधना श्रीवास्तव या लकडी की काठी काठी का घोडा हे गाणं गाऊन खुश करतात. हे गाणे गात असताना त्यांनी गिटार सोबतचा त्यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. इतकी वर्ष बॉलीवुड पासून लांब असून देखील त्यांनी आपल्या गाण्याची आवड सोडली नाही ते आपल्या गाण्याला अव्वल स्थान देतात. उर्मिला मातोंडकर, जिमी शेरगिल ही बॉलीवुडमध्ये जम बसवताना दिसले परंतु आराधना श्रीवास्तव त्यासाठी अपवाद ठरली!