‘मनी हाईस्ट’ वर येणार हिंदी चित्रपट! हा प्रसिद्ध अभिनेता झळकणार प्रोफेसरच्या भूमिकेत…

‘मनी हाईस्ट’ नावाच्या वेब सिरीजने सगळ्यांनाच वेड लावले होते. याच्या पहिल्या सिझन पासूनच या वेब सिरीजने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. २०१७ मध्ये स्पॅनिश नेटवर्क वर ही स्पॅनिश सिरीज दाखवण्यात येत होती. मात्र नंतर नेटफ्लिक्सने या सिरीजचे वितरण हक्क विकत घेतले आणि मग मात्र या सिरीजने जगभर धुमाकूळ घातला. अलीकडेच त्याचा नवा सिझन रिलीज झाला होता.

‘द प्रोफेसर’ नावाचा एक अवलिया बँक लुटायची एक योजना आखतो आणि त्यासाठी आठ लोकांना कामावर ठेवतो. हे आठ लोक असे लोक असतात ज्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नसतं. जगातली सगळ्यात मोठी लुटीची योजना आखणारा प्रोफेसर आणि त्याची ही गॅंग काय काय कारनामे करतात, त्याची कथा म्हणजे ‘मनी हाईस्ट’. अशा या रहस्यमयी पण तितक्याच उत्कंठावर्धक कथानकाची भुरळ लोकांना पडली नाही तर नवलच!

बॉलिवूडलाही या सिरीजची भुरळ पडली आहे. प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते अब्बास-मस्तान यांना या सिरीजच्या कथानकाने मोहात पाडले आहे. त्यामुळे ते लवकरच यावर एक चित्रपट घेऊन येणार आहेत, अशी चर्चा सध्या बॉलिवूड मध्ये रंगताना दिसत आहे. खिलाडी, बाजीगर, बादशाह, ऐतराज, हमराज, नकाब, रेस, प्लेयर्स, रेस २ असे अनेक उत्कंठावर्धक चित्रपट या जोडीने इंडस्ट्रीला दिले आहेत. आता त्यांनी ‘मनी हाईस्ट’ वर चित्रपट बनवायचे ठरवल्यापासून त्याची उत्सुकता वाढलेली दिसून आली.

आता या चित्रपटात अभिनेता अर्जुन रामपाल प्रोफेसरची भूमिका करणार असल्याची बातमी समोर येत आहे. बॉलिवूड मधील से’क्सी अभिनेत्यांमध्ये अर्जुन रामपालची गणना केली जाते. प्रोफेसरची व्यक्तिरेखा ही काहीशी लाजरी पण स्मार्ट, स्वतःच्याच विश्वात मश्गुल असणारी अशी आहे. त्यामुळे अर्जुनला या भूमिकेत पाहणे हे एक सरप्राईज असणार आहे. त्याच्यासाठीही ही भूमिका काहीशी आव्हानात्मक ठरू शकते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arjun (@rampal72)

चित्रपटातील बाकी व्यक्तिरेखा कोण निभावणार आहे, याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र एवढ्या बातमीवरूनही ‘मनी हाईस्ट’ च्या चाहत्यांचे कान टवकारले गेले आहेत. या नव्या चित्रपटाची उत्कंठा वाढू लागली आहे. पुढील वर्षी म्हणजे २०२२ च्या मध्यावर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल, असे बोलले जात आहे.

काय मग मंडळी, या नव्या चित्रपटाबद्दल तुमचे काय मत आहे? कोणत्या अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी या नव्या चित्रपटात भूमिका करावी असे तुम्हाला वाटते? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.