बॉलिवूडमधील या अभिनेत्यांचे बॉडीगार्ड घेतात सर्वात जास्त पगार, सलमानच्या शेराचा पगार जाणून धक्का बसेल..

चंदेरी दुनिया, त्यातून मिळणारी प्रसिद्धी, रसिक प्रेक्षकांचे भोवतीने पडणारे कडे, यांतून वाट काढत जाणारे अभिनेता-अभिनेत्री आपण पाहिले असतीलच. कधी कधी या फॅन लोकांचा या सेलिब्रिटींना इतका त्रास होतो ना म्हणून या सेलिब्रिटी तसेच बऱ्याच हाय प्रोफाईल लोकांभोवती सुरक्षारक्षक (Bodyguards) असतात. या विषयावर ‘बॉडिगार्ड’ सिनेमा बघितला असेल, त्याच पडद्यावरच्या बॉडीगार्डचा खरा बॉडीगार्ड म्हणजे सलमान भाईचा (Salman Khan) ‘शेरा’ आजवरचा सगळ्यात महागडा बॉडीगार्ड आहे. त्याचा पगार सगळ्यात जास्त आहे. ‘शेरा’ (Shera) सेलिब्रिटी बॉडीगार्ड झाला आहे.

याहून ही एक अंगरक्षक असा आहे की जो शेरा भाई पेक्षा जास्त पगार घेतो. कोण आहे तो? त्याचं नाव आहे रवी सिंग (Ravi Singh). रवी हा कुणाचा बॉडीगार्ड आहे. तर रवी ज्याच्याकडे काम करतो तो आहे बॉलीवूडचा किंग उर्फ बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan). रवी कधी प्रकाश झोतात येत नाही. तो या प्रकारणापासून चार हात लांब असतो. पण तो ही शेरा प्रमाणेच शाहरुखच्या सावलीला सुद्धा सुरक्षित ठेवतो म्हणलं तर अतिशयोक्ती ठरू नये.

आज ९ ते १० वर्षे झाली की रवी हा शाहरुखच्या सेवेत रुजू आहे. आणि महत्वाचं म्हणजे रवी यांचा पगार शेरा भाई पेक्षा जास्त आहे. मायदेशात वा परदेशात सर्वत्र शाहरुखच्या सुरक्षेची सगळी जबाबदारी ही रवीकडेच असते. याआधी शाहरुखचा जो सुरक्षा रक्षक होता, त्याचं नाव होतं यासीन. पण यासीनने स्वतःची सुरक्षारक्षक पुरवण्याची कंपनीच सुरू केली आणि या जागेवर रवी सिंग यांची वर्णी लागली.

सलमानच्या शेराला वर्षाला तब्बल २ कोटी ₹ पगार मिळतो. पण रवी सिंग यांना जवळपास पावणे तीन करोड ₹ इतका पगार आहे, असं सूत्रांच्या हवल्यानं समजलं आहे.

अमिताभ आणि अमीर खान हे या बाबतीत जवळपास ही नाहीत. सुरक्षारक्षकाच्या नोकरीबद्दल भरपूर पैसे दिले तरीही ही महत्वाची जबाबदारी इतकी वर्षे पाडत असल्यामुळेच शाहरुख आणि रवी यांचे स्नेहसंबंध तयार झाले आहेत.

शेरा प्रमाणेच रवी यांना शाहरुख आपल्या कुटुंबातील सदस्यच मानतो. रवी जरी प्रसिद्धी पासून दूर राहत असेल तरीही हे वाचून म्हणायला हवं..

“था बस इसिका इंतजार, आया रे सबसे महंगा बॉडीगार्ड

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.