मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खानची मुलगी करणार बॉलीवूड मध्ये पदार्पण? स्वतः सांगितलं सत्य..

बॉलिवूडमध्ये बऱ्याच स्टार्स किड्स नी आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण इंडस्ट्री आपली केली आहे. काही जणांनी आपल्या सेलिब्रिटी आई वडिलांसारखा स्टारडम टिकवून ठेवला आहे तर काही स्टार किड्स कॅमेरा आणि प्रसिद्धीच्या दूनियेपासून लांब राहणे पसंत करतात. आपलं नशीब आजमावत बऱ्याच जणांनी आपले नाव कमावले तर काहींना हे करणे जमले नाही म्हणून त्यांनी या इंडस्ट्रीला टाटा बाय बाय केलं…
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खान नेहमीच चर्चेत असतो. आपल्या अभिनय आणि दिग्दर्शन कौशल्याचा जोरावर त्याने कित्येक दशके चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले आहे. आणि आता त्याची मुलगी आयरा देखील चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. असे म्हटले जात आहे.

आयरा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सतत आपले फोटोज् आणि व्हिडिओज शेयर करत असते आणि नेटकऱ्यांच्या भेटीला येत असते. नुकताच ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लाईव्ह गेली होती. या लाईव्ह सेशन मध्ये ती आपल्या व्ह्यअर्स सोबत प्रश्नोत्तराचा राऊंड खेळत होती. ज्यामध्ये तिला तिच्या फॉलोअर्सनी बरेच प्रश्न विचारले.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

तिच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल देखील प्रश्न विचारले गेले. तिच्या करियर बद्दल प्रश्न विचारल्यानंतर यावेळी आयराला चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या बॉलिवूडमधील डेब्यूविषयी विचारलं. यावर आयराने देखील वेळ न घालवता लगेच उत्तर दिलं. ती म्हणाली की, सध्या तर मला सिनेमांमध्ये कसालच रस नाही. ती म्हणाली, मला अभिनेत्री होण्यात कोणताही रस नाही. यावरून एकच समोर येते की, तिला बॉलिवूडमध्ये कसलाच रस नाही. तिला दिग्दर्शक व्हायचं आहे.

आयरा खानने दिग्दर्शक म्हणून तिचा डेब्यू केला आहे. तिनं थिएटरमध्ये ‘मीडिया’ या प्लेचे दिग्दर्सन केलं आहे. तिच्या या प्लेमध्ये क्रिकेटर युवराज सिंगची बायको हेजल कीचने प्रमुख भूमिका साकारली आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद खानदेखील आपला नवा फिचर सिनेमा घेऊन येते. या सिनेमाचे नाव ‘महाराजा’ असल्याची चर्चा आहे. याची निर्मिती यशराज फिल्म्स करत असल्याची माहिती समोर आली आहे. हा त्याचाही दिग्दर्शक म्हणून हा डेब्यू आहे.