नवरदेवाची घाई नवरीला पडली महागात! पहा धक्कादायक व्हिडिओ…

लग्नसराई म्हटलं की सगळीकडेच उत्साहाचं वातावरण असतं. सगळ्यात जास्त उत्साहात असतात ते म्हणजे नवरा-नवरी. आयुष्यात एकदाच येणारा हा क्षण दोघांनाही आनंदाने, उत्साहाने जपायचा असतो. त्यामुळे त्याच्या सगळ्याच कृतींमध्ये उत्साह भरून राहिलेला असतो. प्रत्येक गोष्ट करताना ते खूप उत्साहाने करताना दिसतात. मात्र कधी कधी हा उत्साह अंगलट देखील येऊ शकतो. असेच काहीसे एका नव्या जोडप्यासह घडले आहे.

‘भूतनी के मीम्स’ (bhutni ke memes) या इंस्टाग्राम अकाऊंट वर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओ मध्ये एका नवऱ्या मुलाचा उत्साह नवरीला कसा महागात पडला ते पाहायला मिळत आहे. या व्हिडिओ मध्ये नवरा मुलगा स्टेज वर उभा आहे. तर नवरी मुलगी देखील दिमाखात स्टेज जवळ येते. दोघे शेकहॅण्ड करतात. त्यांचा शेकहॅण्ड करतानाचा फोटो काढत असतात. दोघेही खूप छान पोज देत हसऱ्या चेहऱ्याने कॅमेरा फेस करताना दिसत आहेत.

कॅमेऱ्याला पोज देऊन झाल्यानंतर नवरी मुलगी स्टेज वर चढण्यासाठी सज्ज होते. नवऱ्या मुलाच्या हातात दिलेला हात न सोडता ती त्याच्या आधाराने स्टेज वर चढण्याचा प्रयत्न करते. मात्र नवरा मुलगाही नवरीला शेजारी उभी करण्यासाठी खूप उत्साहात असतो. या उत्साहाच्या भरात तो नवरी मुलीला स्टेज वर येण्यासाठी मदत करण्याऐवजी तिला जोरात ओढतो. त्यामुळे बिचारी नवरी स्टेज वर पाय टाकण्यापूर्वी स्टेज वर आडवी होते. नवऱ्या मुलाने तिला पटकन ओढल्याने तिचा तोल जातो आणि ती चक्क तोंडावर पडते.

नवऱ्या मुलीला सांभाळण्यासाठी तिच्या मागे उभी असलेली बाई समोर येते, मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. कोणाला काही कळण्यापूर्वीच घटना घडून गेलेल्या असतात. नवरदेवाने नवऱ्या मुलीला असे तोंडावर पाडलेले पाहून मागे उभे असलेले लोकही हैराण झाले आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

काय मग मंडळी, तुमच्या लग्नात झाल्या होत्या का अशा काही गमतीजमती? आम्हाला तुमच्या लग्नातल्या या गमतीजमती कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या उत्साहाच्या भरातल्या करामती इतरांसोबतही शेअर करा.

जगभरातल्या अशाच काही बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा. तसेच आमच्या सोशल मीडिया पेजेसना फॉलो करायला विसरू नका. तुम्हाला आमचे आवडलेले लेख जरूर लाईक आणि शेअर करा.