कधीकाळी २-२ रुपये मिळण्यासाठी लग्नात नाचत असायचा, आज आहे बॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता..

जीवनामध्ये यश मिळवायचे असेल तर म्हणतात कष्टाशिवाय पर्याय नाही. तसेच काही फिल्म इंडस्ट्री मध्ये हि आहे. लाखो लोकांचे स्वप्न असते कि आपण एकदा प्रसिद्ध व्यक्ती किंवा अभिनेता/अभिनेत्री बनाव, परंतु यातील काही स्वतः कष्ट करून हे स्थान मिळवत असतात. आज आम्ही तुम्हला असाच एका बॉलिवूड अभिनेत्याबद्दल सांगणार जो एका गरीब कुटूंबातून असून कष्ट करून एक प्रसिद्ध कलाकार बनला आहे.

फोटो पाहून तुम्हाला समजलेच असेल कि आम्ही कोणाबद्दल बोलत आहे. १९ मे १९७४ रोजी उत्तर प्रदेशमधील बुढाना या छोट्याशा गावात जन्मलेल्या नवाज यांची आज इंडस्ट्रीमधील टॉप स्टार्समध्ये गणना केली जाते. पडद्यावर प्रत्येक प्रकारची भूमिका करणाऱ्या नवाज यांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप कष्ट करावे लागले आहे.

नवाजच्या आयुष्यात एक वेळ अशीही होती जेव्हा ते २-२ रुपये गोळा करण्यासाठी लग्नात डान्स करत होते. त्यांनी स्वत: एका मुलाखतीत याचा खु’लासा केला आहे.

नवाजुद्दीनने मुलाखतीत सांगितले होते की लहान असताना तो लग्नाच्या वेळी मित्रांसोबत नृत्य करीत असे कारण लोक लग्नाच्या कार्यक्रमांवर पैसे खर्च करीत असत. या कारणास्तव, तो सभोवतालच्या सर्व लग्नांमध्ये जात असे. दिवस अखेरीस ते नाचून सुमारे २-३ रुपये कमावत असत, त्याकाळी २-३ रुपये म्हणजे त्यांना बरेच वाटत होते.

त्यांचे चित्रपट पाहून आपण सांगू शकतो कि नवाज हे एक सुप्रसिद्ध कलाकार आहेत. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी कधी वॉचमनची नोकरी देखील केली आहे. नोकरी मध्ये रस नसून त्यांना अभिनयाची आवड होती. या अभिनय बगमुळे त्यांनी आपली नोकरी सोडून मुंबईला यायचे ठरवले. एकदा ते मुंबईला आले आणि त्यांचे नशिब त्याला साथ देऊ लागला.

त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते- जेव्हा मी एखाद्याला मला अभिनेता व्हायचे आहे असे सांगायचे तेव्हा तो माझा चेहरा आणि माझी उंची पाहत असे. पण मला पूर्ण खात्री होती की मी अभिनेता होऊ शकतो कारण माझा असा विश्वास आहे की अभिनयामध्ये अभिनेत्याचा चेहरा नाही तर एक्टिंग पाहून काम दिले जाते. म्हणून मी चित्रपटांमध्ये काम करण्याचे स्वप्न घेऊन मुंबईला आलो.

त्यांनी सांगितले होते की- चित्रपटांमध्ये काम करण्याचे माझे स्वप्न आहे आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी मी जीवनामध्ये खूप संघर्ष केला आहे. मी एका गरीब कुटुंबातील आहे, म्हणून घराचा खर्च चालवणे माझ्यासाठी सोपे नव्हते. सुरुवातीच्या काळात मी पहारेकरी म्हणून काम केले आहे. त्यानंतर, मी औषधाच्या दुकानात केमिस्ट म्हणून काम करायला लागलो. पण मी कुठेतरी अभिनेता होण्याची इच्छा सोडत नव्हतो.

त्यांनी सांगितले होते- माझ्याकडे अभिनेतासारखे व्यक्तिमत्वही नव्हते, तरीही मला अभिनेता होण्याचा हट्ट होता आणि मी माझ्या मेहनतीने हे केले आणि शेवटी मी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले.

नवाजच्या कारकीर्दीची सुरूवात १९९९ मध्ये सरफरोश या चित्रपटाने झाली. कोणालाही या सुरुवातीची माहिती नव्हती. २०१२ पर्यंत नवाजने अनेक छोट्या-मोठ्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या, पण त्यांना विशेष ओळख मिळाली नाही. चित्रपटाच्या कास्टिंगच्या बाहेर त्याच्या नावाचा आवाज नव्हता. त्यानंतर अनुराग कश्यपने त्यांना फैजल बनवून त्याची गँग्स ऑफ वासेपुरशी ओळख करून दिली.

नवाजुद्दीन प्रत्येक भूमिकेत आपला जीव टाकून भूमिका करत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते कित्येक तास बंद खोल्यांमध्ये सराव करत. एका मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितले कि- मी परत माझ्या गावी जातो आणि तिथे जाऊन शेताची देखभाल करतो आणि काही दिवस शेती करतो. असे केल्याने त्याच्या मनाला शांती मिळते आणि मग तो एका नवीन पात्राच्या तयारीत मग्न असतो.

ब्लॅक फ्राइडे, गँग ऑफ वासेपुर, कहानी या चित्रपटामधून त्यांना बॉलिवूड मध्ये खरी ओळख मिळाली.त्यानंतर सलमान खानच्या किक चित्रपटानंतर ते स्टार यादीमध्ये सामील झाले.

नवाजुद्दीन सिद्दीकी हे त्याच्या ९ भावंडांमध्ये सर्वात मोठे आहेत. पत्नी अंजली उर्फ ​​आलियाशिवाय नवाजच्या कुटुंबात दोन मुले आहेत. मात्र, नवाजचे २०२० मध्ये आलियापासून घट स्फो ट झाले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मुलीचे नाव शोरा तर मुलीचे नाव यानी आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.