पती सोबत या आलिशान घरामध्ये राहते नेहा कक्कड, कोणत्या महालापेक्षा कमी नाही नेहा-रोहनप्रीत यांचं हे घर..

हिंदी चित्रपटसृष्टी मध्ये अभिनेता-अभिनेत्री असो किंवा गायक-गायिका यांचं जीवन, राहणीमान याच्याबद्दल सर्वसामान्य लोकांना खूप उत्सुकता असते. कारण ते खूपच स्टायलिश पद्धतीने ते आयुष्य जगत असतात. सिलेब्रिटी लोकांची एक झलक मिळावी म्हणून प्रेक्षकांची धडपड सुरू असते. आधीपेक्षा या सिलेब्रिटी लोकांबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेणं सोपं झालं आहे. कारण आहे इंटरनेट. समाजमाध्यमांवर (Social Media) वर हे लोक आपले फोटो व्हिडिओ टाकत असतात. त्यामुळे त्यांच्या बद्दलची बरीचशी माहिती मिळत असते.

सध्याची अशीच तरुण सिलेब्रिटी आहे गायिका नेहा कक्कड. (Neha Kakkar) नेहाने आपल्या भविष्यबद्दल आधी विचारही केला नसेल की इतकं यश आपल्याला लाभेल. कारण तिच्या सुरुवातीच्या काळात ती उत्तर भारतातल्या पद्धतीनुसार होणाऱ्या देवीच्या जागरणात गाणी गायची. तिच्या सोबत तिची बहीण सोनू (Sonu Kakkar) आणि भाऊ टोनी (Tony Kakkar) हे ही होतेच. त्याचेच पैसे मिळायचे. सोबत वडील सामोसे विकण्याचं काम करायचे. या दोन्ही मधून हृषीकेश मध्ये राहणारं हे कुटुंब आपली गुजराण करायचं.

नेहा कक्कडचं वैशिष्ट्य आहे की तिने जी गाणी गायिली आहेत, त्यापैकी बहुधा पार्टी साँग जास्त आहेत. ही गाणी गाण्यासाठी नेहा मोठी रक्कम घेते. तिच्याबद्दल अजून जाणून घेऊयात,

नेहाने कठोर मेहनत घेऊन स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. वेळ-काळाप्रमाणे तिने आपलं राहणीमान बदललं…२०२० च्या ऑक्टोबर महिन्यात नेहाचं शुभमंगल झालं. पंजाबी गायक ‘रोहनप्रीत सिंह’ याच्याशी तिने लगीनगाठ बांधली. नवीन आयुष्य, नवीन संसार यासाठी या जोडप्याने नवीन घर घेतलं. या घरातले छान छान फोटो ती शेअर करत असते.

नेहा – रोहनप्रीत यांचं घर आतून खरंच खूप सुंदर आहे. बैठकीची खोली ज्याला आपण Hall म्हणतो. ती खूपच खास पद्धतीने सजवली आहे. इंटेरिअर डिझाईनरने चोख पद्धतीने रंग निवडले आहेत. सजावाटीसाठी खूप व्यवस्थित विचार करून, वेळ घेऊन काम केलं आहे. दरवाजांचे रंग हे सोफ्याला साजेसे आहेत. या खोलीला एका बाजूला पक्क्या भिंतीऐवजी काच लावण्यात आली आहे.

त्यामुळे मुंबईच्या टोलेजंग इमारती दिसून येतात, आणि वर निळं शार आकाश. या नव दाम्पत्याने खूप मनापासून सजवलं आहे. रंगकाम, सजावट, फर्निचर सगळंच उत्तम आहे. शयनकक्ष म्हणजे Bedroom ची सजावट नेहाने स्वतः केली आहे. तिने याच बरोबर नवीन मर्सिडीज (Mercedez) घेतली आहे.

जागरणात आपल्या भावंडांसोबत गाणी म्हणून नेहाने आपल्या सांगीतिक प्रवासाला सुरुवात केली. त्यातून सुरुवातीला उत्पन्नाची रक्कम मिळायची पण या सोबतच देवीचा आशीर्वाद ही मिळाला असावा. त्याच्या जीवावर व कष्टाच्या जोरावर हे सगळं तिने प्राप्त केलं. दुर्गामातेच्या वर असलेली श्रद्धा म्हणून तिने हृषीकेश असो की मुंबई दोन्हीकडे मोठं देव घर केलं आणि भक्तिभावाने ती देवीला पूजते. जसा नेहा आणि भावंडांना जसा देवीचा आशिर्वाद मिळाला तसा सगळ्यांना मिळो.