मोठी बातमी! सुप्रसिद्ध मराठी शो ‘चला हवा येऊ द्या’ सोडणार निलेश साबळे आले हे समोर कारण…

मराठी टीव्ही विश्वावर राज्य करणारा मराठी करमणुकीतील बेफान तुफान आणि भन्नाट असा शो चला हवा येऊ द्या याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. चला हवा येऊ द्या एक मनोरंजन करणारा कार्यक्रम आहे. जो खूप साऱ्या वर्षांपासून झी मराठी वर सध्या सक्रिय आहे.

‘चला हवा येऊ द्या’ हा शो खूप फेमस आहे. मराठी सोबतच हिंदी मधील खूप सारे दिग्दर्शक आणि कलाकार आपल्या चित्रपटाचे प्रोमोशन येथे करायला येत असतात. अशामुळे हिंदी कलाकार मराठी कलाकारांना आपल्याकडे खेचून घेतात. पण सध्या चला हवा येऊ द्या शो खूप प्रसिद्ध असताना एक नवीन बातमी समोर आली आहे.

ही बातमी ‘चला हवा येऊ द्या’ मधील एक कलाकाराबद्दल आहे. शो मधील हसताय ना हसलच पाहिजे असं म्हणून महाराष्ट्राला भुरळ घालणारे सगळ्यांचे चाहीते अभिनेते दिग्दर्शक लेखक निलेश साबळे सध्या एका कारणामुळे चर्चेत आले आहेत. प्रसिद्ध शो ‘चला हवा येऊ द्या ‘ या शोत अँकरिंग करणारे निलेश साबळे शो सोडणार असल्याची बातमी सध्या व्हायरल होत आहे. नुकताच आमच्या मिडीया लाईनला एक व्हिडिओ मिळाला आहे ज्यात असे दिसत आहे की, निलेश साबळे यांनी जागा आता माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील परी हिने घेतली आहे. त्यामुळे निलेश साबळे यांची खुर्ची सध्या संपुष्टात असल्याचे दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की मायरा चला हवा येऊ द्या शोचे सूत्रसंचालन करत असताना दिसत आहे. यावेळी रंगमंचावर असताना निलेश साबळेम्हणतात की, परी तू झी मराठी अवॉर्ड अंकरिंग करणार आहेस का..? त्यानंतर मायरा म्हणते की, हो. मग निलेश साबळे म्हणतात की झी मराठी अवॉर्ड अंकरिंग तर मी करणार आहे. चॅनेल कडून मला एक फोन येऊन गेलेला आहे ते मला पैसे ही देणार आहेत.

यावर हुशार परी म्हणते की मलाही चॅनेल कडून फोन आला होता आणि मलाही ते पैसे देणार आहेत. त्यावर खाजगी पण सरकारी असा प्रश्न करत निलेश साबळे परीला विचारतात की तुला किती पैसे मिळणार आहेत..? त्यावर परी गोड आवाजात म्हणते की मला मिळणारे बिस्कीटचा पुडा. यावेळी अंकरिंग केल्यानंतर परीला बिस्कीटचा पुडा मिळणार आहे कळल्यानंतर प्रेक्षक खूप हसतात.