ना चित्रपटात काम, ना नवऱ्याची कमाई! तरीही करिष्मा कपूर जवळ आहे इतकी संपत्ती…

एक काळ असा होता, की अभिनेत्री करिष्मा कपूरने आपल्या निरागस अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवली होती. मात्र तिचे लग्न झाले आणि करिष्मा चित्रपटसृष्टीपासून लांब गेली. १९९१ मध्ये करिष्माने ‘प्रेम कैदी’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर तिने सुपरहिट चित्रपटांची मालिकाच सुरू केली. राजा हिंदुस्तानी, फिजा, दिल तो पागल है, जुडवा, बीवी नं. १, झुबेदा, अंदाज अपना अपना, जानवर, हिरो नं. १, राजा बाबू, हसीना मान जाएगी, जीत, कुली नं. १, साजन चले ससुराल अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करत करिष्माने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली.

लग्नानंतर करिष्माने अभिनय सोडला. संसार, मुलं यांच्यात ती रमून गेली. मात्र नंतर तिने घटस्फोट घेतला. तिने पुन्हा चित्रपटसृष्टीत येण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी झाला. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, की नवऱ्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर आणि चित्रपटांमध्ये काम करत नसूनही करिष्मा करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे. ती अजूनही वर्षाकाठी कोट्यवधींची कमाई करताना दिसते. याशिवाय तिच्याकडे आलिशान गाड्यांचा ताफाही आहे.

करिष्माकडे मर्सिडिज-बेन्ज एस क्लास, लेक्सस एलएक्स 470, मर्सिडीज बेन्ज ई क्लास, बीएमडब्लू 7 सीरीज अशा आलिशान गाड्या आहेत ज्यांची किंमत करोडोंच्या घरात आहे. एका मीडिया रिपोर्ट नुसार, करिष्मा कपूरकडे ८७ कोटी रुपये इतकी संपत्ती आहे. अर्थात तिच्याकडे इतका पैसा कुठून येतो, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच.

करिष्मा चित्रपटांमध्ये काम करत नसली, तरी तिने अलीकडे काही वेब सिरीज मध्ये काम केले आहे. शिवाय ती नेहमीच अनेक जाहिरातींमध्ये झळकताना दिसते. यातील काही जाहिराती तिची बहीण करीना कपूरसोबत आहेत. २०२० मध्ये करिष्माने ‘मेंटलहूड’ नावाच्या वेब सीरिज मध्ये दिसली होती. या वेब सिरीजच्या माध्यमातून तिने मनोरंजन सृष्टीत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये तिने आईची भूमिका साकारली होती. या भूमिकेला अनेक शेड्स होत्या. या वेब सिरीजला बरीच पसंती मिळाली. या वेब सिरीज मध्ये करिष्मासह अनेक कलाकारांनी काम केले होते.

सध्या तरी करिष्माने आपल्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही. मात्र ती वरचेवर जाहिरातींमध्ये दिसून येते. करिष्मा सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. तसेच ती सोशल मीडिया वरही बरीच सक्रीय असलेली पाहायला मिळते. तिचे आणि तिची बहीण करीनाचे एकत्र फोटो सोशल मीडिया वर बरेच व्हायरल होताना दिसतात.