‘तारक मेहता..’ मधील जुनी सोनू करतेय लग्न! समोर आले वधूच्या कपड्यामध्ये फोटो..

झील मेहता ही एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आणि एक होतकरू विद्यार्थिनी आहे. तिने वयाच्या ९ व्या वर्षी चहा चाईल्ड आर्टिस्ट म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिला ओल्ड सोनू या नावानेही ओळखले जाते. झीलचा जन्म २८जून १९९५ रोजी मुंबईत झाला. तिचे वडील नलिन मेहता हे व्यापारी होते आणि आई लता मेहता ब्युटीशियन होत्या. तिने बालकलाकार म्हणून २००८ साली तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील सोनूच्या भूमिकेतून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तिनेचलती का नाम गाड़ी या मालिकेतही काम केले.

टीव्हीचा सर्वात प्रसिद्ध शो तारक मेहता का उल्टा चष्मा सध्या खूप चर्चेत आहे. हा शो जवळपास १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील सर्व पात्र आता प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग बनले आहेत. ही पात्रे कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतात. आजकाल तारक मेहता शोमध्ये सोनू भिडेची भूमिका करणारी झील मेहता तिच्या ताज्या छायाचित्रांमुळे चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Jheel Mehta (@jheelmehta_)

अलीकडेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसून येत आहे. या फोटोंमध्ये ती वधूच्या पेहरावात दिसत असून चाहते या फोटोंना भरभरून प्रेम देत आहेत. आणि त्यांच्यावर प्रचंड लाईक आणि कमेंट करत आहेत.

झील मेहताने या शोला अलविदा केला असले तरी ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिने सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत, जे तिला चांगलेच आवडत आहेत. बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणारी झील मेहता आतापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. त्याचवेळी तारक मेहता या शोमधून त्यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली होती. पण काही वर्षांनी तिने या शोला अलविदा केला होता.

View this post on Instagram

A post shared by Jheel Mehta (@jheelmehta_)

झील मेहता ही गुजरातची रहिवासी आहे परंतु सध्या ती मुंबईत राहते. झील मेहताची आई ब्युटीशियन आहे तर वडील व्यापारी आहेत. झील मेहता हिला फिरण्याची खूप आवड आहे. तिच्या या वायरल होणाऱ्या फोटोवरती चाहतेही उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले, मॅडम, तुम्ही या लेहेंग्यात खूप सुंदर दिसत आहात. तर दुसर्‍याने लिहिले की वाह खूप सुंदर. या फोटोंवर कमेंट करताना दुसर्‍या यूजरने लिहिले की, “विश्वास बसत नाही की ही तीच मुलगी आहे.