अबब! लग्नाच्या दिवशी कळलं नवरी निभावूशकत नाही नाते कारण तिला नाही…

मित्रहो सोशल मीडिया मुळे खूपशा चकित करणाऱ्या घटना आपल्या कानावर पडत असतात, त्यातीलच एक ग्वालीयर मधील घटना अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये पती पत्नी असणाऱ्या जोडप्याचे ४ मार्च २०१७ ला मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते. यामधील पती असणारा डॉक्टरी पेशात आहे तर जी पत्नी आहे ती सुद्धा एक डॉक्टर आहे. दोघेही समंजस असले तरीही हल्ली सुशिक्षित लोक सुद्धा विचित्र वागत आहेत, जे कल्पनेच्या पलीकडे आहे. कोण कसे खोटे बोलेल काही सांगता येत नाही, त्यामुळे कोणाशी जपून राहावे हे सुद्धा कळत नाही.

यामधील जी पत्नी आहे तिने लग्नाच्या चौथ्या दिवशी नाते निभावण्यापासून माघार घेतली. कारण असे आहे की ती एक नपुंसक होती, त्यामुळे तिची शारीरिक क्षमता व्यवस्थित न्हवती. ही बाब तिच्या पतीला तिने लग्नाआधी अजिबात सांगितली न्हवती, त्यामुळे त्याने या गोष्टीवर चिडून कोर्टात तक्रार दाखल केली. पण ती महिला आपली शारीरिक विकृती मान्य करायला तयारच न्हवती. तिने उलट तिच्या पतीवर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली.

लग्नाच्या बरोबर ५ महिन्यानंतर डॉ. पतीने आपल्या पत्नीविरुद्ध इंदोरच्या कुटुंब न्यायालयात तक्रार दाखल केली. पण तिने वेळेवर तिथे हजेरी लावली नाही, आपले मेडिकल चेकअप करून घेतले नाही त्यामुळे या केसचा निकाल लागायला बरोबर साडे चार वर्षे गेली. तब्बल साडे चार वर्षानंतर पतीला तिच्यापासून घटस्फोट मिळाला आहे. जेव्हा कोर्टात सुनावणी झाली तेव्हा ती महिला व तिच्या घरच्यांनी उलट त्या पतीवर वेगवेगळे गंभीर आरोप केले होते.

कोर्टाद्वारे मेडीकल चेकअप करण्यात आले आणि जवळजवळ दीड वर्षापर्यंत हे केसचे प्रकरण सुरूच होते. त्यानंतर कोर्टाने त्या महिलेवर तपास करून घेण्याची सक्ती केली आणि तेव्हा त्या तपासातून त्या महिलेची सगळीच पोल खोलली गेली. त्यातून असे कळले की लग्नाआधी तिने दोन वेगवेगळ्या सर्जरी केल्या होत्या, ज्या पतीपासून लपवल्या होत्या. प्रधान न्यायाधीश अनिल कुमार सोनाने यांनी आपल्या आदेशात असे लिहले की महिलेने शारीरिक विकृती लपवून तरुणाला धोका दिला आहे.

या विवाहाला कोर्टाने सुद्धा शून्य घोषित केले आहे. ही घटना खरच चकित करून सोडणारी आहे. आजवर अशी घटना कानावर जास्त पडलीच न्हवती. मात्र सोशल मीडियावर सुद्धा यामुळे चर्चा खूपच रंगली आहे. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.