कधीकाळी पेन विकून, मजुरी करून भरायचा पोट, कष्टाच्या जोरावती असा बनला सदिचा विनोदाचा बादशाह..

बॉलिवूड सृष्टीमध्ये असे अनेक नामांकित कॉमेडियन आहेत. ज्यांनी आपल्या जोरदार कॉमिक स्टाईलने लोकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या विनोदी कलाकारांपैकी एक म्हणजे बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि विनोदी कलाकार जॉनी लीवर. सिनेमातील सर्वोत्कृष्ट कॉमेडीसह त्याने आपल्या चित्रपट कारकीर्दीत बर्‍याच सुपरहिट चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका करून प्रेक्षकांना प्रचंड हसवले आहे.

जॉनी लीवरच्या चित्रपट कारकीर्दीत कमालीची टक्कर झाली आहे. बहुतेक चित्रपटांमध्ये त्याने विनोदी भूमिका केल्या असून या भूमिकेतून त्याने बरीच प्रसिद्धी मिळविली आहे. जवळजवळ ४ दशकांत जॉनी लीवर बॉलिवूड चित्रपटासाठी योगदान देत आहे. त्याने बॉलिवूडच्या जवळपास सर्व सुपरस्टार्ससह स्क्रीन सामायिक केली आहे.

जॉनी लीवरने मिळवलेले स्थान मिळवणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. परंतु, जॉनी लीवरने आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. त्यानंतर तो बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा उत्कृष्ट उंचावर पोहोचू शकला आहे. आज जॉनी लीवर बॉलीवूडचा सर्वात लोकप्रिय कॉमेडियन म्हणून ओळखला जातो. जॉनी लीवर आपल्या फॅमिलीबरोबर खूप आलिशान जीवन जगत आहे.

आज जॉनी लीवर त्याच्या कष्टाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर इंडस्ट्रीत इतका मोठा स्टार बनला आहे. परंतू, त्यांचे बालपण अतिशय गरीबीत गेले आहे. त्याने आयुष्यात प्रचंड संघर्ष केला आहे.
जॉनी लीवरचा जन्म साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. चित्रपटसृष्टीत करिअर करण्यापूर्वी जॉनी लीवर आपले कुटुंब चालविण्यासाठी अनेक प्रकारच्या नोकर्‍या करत होता.

जॉनी लीवरच्या आयुष्यात एकवेळ असाही काळ आला होता. त्यावेळी त्याला मुंबईच्या रस्त्यावर पेन विकून पैसे कमवायचे होते. जॉनी लीवरचे सुजाताबरोबर अगदी लहान वयातच लग्न झाले होते आणि त्या दिवसांमध्ये जॉनी लीव्हरच्या घराची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती.

त्यामुळे ते ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ मध्ये ऑपरेटर म्हणून काम करायचे. त्या कामातून घरातील खर्च आणि आपल्या वडिलांना मदत करायचे. त्याच घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे जॉनी लीव्हर फक्त सातवीत शिकला आहे. मग आपल्या वडिलांवर जास्त ओझे होऊ नये म्हणून त्याने नोकरी करण्यास सुरवात केली.

त्या नोकरीबरोबर जॉनी लीवर अर्धावेळ मुंबईच्या रस्त्यावर पेन विकत होता. मोकळ्या वेळात जॉनी लीव्हर लोकांची नक्कल करून त्यांचे मनोरंजन करत असत आणि या कौशल्याची खरी ओळख त्याच्या वार्षिक कार्यक्रमातून होत असयायची.

दरम्यान, बॉलिवूडमध्ये तो त्याच नशीब शोधायला गेला होता. तेथे त्याला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. आज जॉनी लीवर बॉलिवूडचा एक प्रसिद्ध कॉमेडियन बनला आहे. त्याने आतापर्यंत करिअरमध्ये सुमारे ३५० चित्रपटांमध्ये काम केले आहे. यातूनच त्याने खूप नाव आणि प्रसिद्धी मिळविली आहे.