चाहत्याची मिठी पडली महागात.! अभिनेते पवन कल्याण स्वतःच्याच कार खाली आले…थोडक्यात जीव वाचला..

मित्रहो मनोरंजन क्षेत्रातील सर्व कलाकार प्रचंड लोकप्रिय आहेत, त्यांच्या चाहत्यांची वस्ती अगदी जगभर असतेच. या कलाकारांनी आपल्या मेहनतीवर एवढा मोठा चाहता वर्ग मिळवला आहे त्यामुळे त्यांचे नेहमीच खूप कौतुक वाटत असते. त्यांची एक झलक पाहण्यासाठी रसिक मंडळी प्रचंड गर्दी करतात, अगदी धडक मारून त्यांना पाहत असतात. त्यांना पडद्यावर पाहणे आणि प्रत्यक्ष पाहणे काहीसा फरक असतोच, तरीही त्यांचा अभिनय आपणाला त्यांच्या प्रेमात पाडत असतो. म्हणून सर्व रसिक त्यांच्या कडे सहज खेचले जातात.

खूपदा असेही होते की हे कलाकार कधी काही कामानिमित्त बाहेर गेले असता चाहत्यांचा ढीग लागतो. चारी बाजूनी हे चाहते गर्दी करत असतात. कधी कधी हे कलाकार सुद्धा या गर्दीत चेंगरले जातात, त्यांच्यावर देखील कधी कधी वाईट प्रसंग येतात. नुकताच असा एक प्रकार समोर आला आहे जो विशेष चर्चेत आला असून यामध्ये एक कलाकार थोडक्यात वाचले आहेत. यामध्ये चाहत्याला मिठी मारण्यासाठी अभिनेते पवन कल्याण यांनी धाव घेतली आणि ही धाव त्यांना चांगलीच महागात पडली.

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि जनसेवा पक्षाचे सर्वेसर्वा पवन कल्याण यांची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यांनी आपल्या चाहत्याला मिठी मारतेवेळी जीव गमावता गमावता वाचवला. हे राजकीय नेते जेव्हा रॅली मध्ये टपावर उभे राहिले होते, त्यावेळी त्यांचा एक चाहता मोठ्या उत्साहाने त्याना मिठी मारण्यासाठी आला होता. अतिउत्साहात या चाहत्याने अचानक झडप टाकल्याने अभिनेते पवन कल्याण पडणार होते. त्यांनी स्वतःला वेळीच सावरले त्यामुळे काहीही दुर्घटना होण्यापूर्वी सगळं व्यवस्थित रोखले गेले.

अचानकच तो चाहता अंगावर आल्याने पवन कल्याण स्वतःच्याच कार खाली येणार होते,तर वेळीच त्यांनी स्वतःला सावरले. हा प्रकार आंध्रप्रदेश मध्ये घडला आहे, ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असल्याने अनेकजण यावर निरनिराळ्या कमेन्ट करत आहेत. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे, त्यामुळे अभिनेते पवन कल्याण यांचे सर्व चाहते त्यांची खूप चर्चा करत आहेत. शिवाय त्यांना काळजी घेण्यास सांगत आहेत. हा व्हिडीओ पाहताना अनेकांचा श्वास रोखला जातो, कारण ही घटनाच अचानक घडली असल्याने थक्क करत आहे.

या अतिउत्साहित चाहत्याने पवन कल्याण यांना मिठी मारण्यासाठी प्रयत्न केला होता, पण त्याचा तोल गेल्याने ते दोघेही पडले. अभिनेते पवन कल्याण हे गाडीवरच पडले असल्याने त्यांना जास्त काही दुखापत झाली नाही. पण हा प्रकार आता भलताच चर्चा रंगवत आहे. पवन कल्याण यांचे सर्व चाहते त्यांची कमेन्ट द्वारे विचारपूस करत आहेत. पवन कल्याण आता सुखरूप आहेत, त्यांना आणखीन सुखरूपता लाभो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.