सुप्रसिद्ध कॉमेडियन सुलिन ग्रोव्हरच्या पत्नीचे फोटो पाहून तुमचे देखील ‘होश’ उडतील..

प्रेक्षकांना कॉमेडी शो बघायला प्रचंड आवडतात. रोजच्या ताणतणाव, टेन्शनमध्ये जगत असतात थोडावेळ जरी कॉमेडी शो पाहिला तर सगळ टेन्शन विसरून माणूस हसायला लागतो. कॉमेडी शो पाहिल्यानंतर एक वेगळीच एनर्जी मिळते. त्यामुळे प्रेक्षकांचा जास्त कल कॉमेडी शो पाहण्याकडे असतो.

आपल्या सर्वोत्कृष्ट कॉमेडीद्वारे प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारा सुप्रसिद्ध कॉमेडियन सुलिन ग्रोव्हर हा अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. आतापर्यंत अनेक चित्रपटात दिसलेल्या सुलिन ग्रोव्हरने कॉमेडी विश्वात प्रचंड नाव कमावले आहे. कपिल शर्माच्या शोमधून त्याला उत्तम यश आणि प्रसिद्धी मिळाली आहे. आज सुनील ग्रोव्हरची फॅन फॉलोव्हिंग बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही.

सुलिन ग्रोव्हर नेहमीच त्याच्या विनोदांनी प्रेक्षकांना हसवण्याच काम करत असतो. कपिल शर्माच्या शोमध्ये कधी गुत्थी, कधी डॉक्टर मशहुर गुलाटी तर कधी रिंकू भाभी बनून त्याने आपल्या भूमिका पार पाडल्या. डॉक्टर मशहुर गुलाटी तर त्याच्या नावाप्रमाणेच अगदी प्रसिद्ध झाले आहे. डॉक्टर मशहूर गुलाटी बनून, सुनील ग्रोव्हरने प्रेक्षकांच्या मनात एक सुंदर अशी जागा निर्माण केली आहे.

सुलिन ग्रोव्हर बद्दल अनेकदा चर्चा होत असतात. मात्र, त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर खूप काही आहे. सुलिन ग्रोव्हरची पत्नी प्रचंड सुंदर आहे. सुलिन ग्रोवर याचा जन्म 3 मार्च 1977 रोजी हरियाणाच्या मंडी डबवाली येथे झाला. सुलिनने 1998 साली आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटात तो दिसला होता. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अजय देवगण यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

सुलिन ग्रोव्हरने आरती ग्रोव्हरशी लग्न केले. सुलिन ग्रोव्हरची पत्नी आरती लाइम लाइटपासून दूर आहे. ती सिनेमा आणि टेलिव्हिजनच्या दुनियेपासून दूर आरामशीर आणि साधे सरळ जीवन जगते. बॉलिवूड जगताशी तिचा काही एक संबंध नाही आहे. फोटोंमध्ये देखील सुलिनची पत्नी आरती प्रचंड सुंदर दिसत आहे. ती तिच्या सौंदर्याने बॉलिवूडच्या सौंदर्यवतींना देखील टक्कर देते. जरी आरतीला हेडलाइन्समध्ये रहायला आवडत नसले तरी देखील, तिला पाहून प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचे कौतुक करतो. तिचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल तुफान व्हायरल होवून धुमाकूळ घालत आहे.

सुलिन ग्रोव्हरने आपल्या सर्वोत्कृष्ट कॉमेडीसाठी नाव कमावले आहे. तर त्याची पत्नी आरती ग्रोव्हर ही पेशाने इंटिरियर डिझायनर आहेत. सुलिन आणि आरती या दोघांना मुलगा आहे. त्याचे नाव मोहन आहे. दोघेही अनेक वर्षांपासून सुखाने संसार करत आहेत. सुनील ग्रोव्हर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. अधूनमधून तिथे तो पत्नी आणि मुलाची फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत राहतो.

दरम्यान, इंस्टाग्रामवर, सुलिनची चांगलाच चाहता वर्ग देखील आहे. त्याला इन्स्टाग्रामवर तब्बल 42 लाख लोक फॉलो करत आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर सुलिन ग्रोव्हर कपिल शर्मा या शोसोबतच इतरही अनेक शोचा एक भाग आहे. अलीकडेच ‘तांडव’ या वेब सीरिजमध्ये सुलिन ग्रोव्हर दिसला होता, यामध्ये अभिनेता सैफ अली खानने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.