बापरे.! हास्यजत्रा मधून प्राजक्ता माळीने घेतला ब्रेक….कारण ऐकून थक्क व्हाल…..

मित्रहो मराठी रंगभूमीवर नेहमीच हास्याचे दमदार विनोद घेऊन येत असलेला शो “महाराष्ट्राची हास्यजत्रा” प्रचंड लोकप्रिय बनत आहे. या कार्यक्रमातून अनेक कलाकार आपला वेडेपणा दिमाखात सादर करून रसिकांना खळखळून हसवताना दिसत असतात. त्यामुळे दिवसभराचा ताण कमी होऊन रक्ताची पातळी वाढवणारा हा कार्यक्रम फार कमी वेळात जास्त लोकप्रिय झाला आहे. यातील प्रत्येक पात्र लक्षवेधी आहे, परोक्षकपासून ते सूत्रसंचालक देखील खूप छान आहेत. या कार्यक्रमाला आपल्या सूत्रसंचालनाने आकर्षक बनवणारी प्राजक्ता माळी देखील यातून प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

प्राजक्त नेहमीच सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते, शिवाय ती प्रोफेशनल लाईफ सोबतच पर्सनल लाईफला घेऊन देखील विशेष चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने लग्नाबद्दल आपले खास मत व्यक्त केले होते. तिने यावेळी आपल्या पोस्टमधून लिहते की “लग्न करावे तर प्रेमविवाह करूनच, नाहीतर लग्न करू नये. कुठल्याही लग्न संस्थेच्या आहारी जाऊ नये.” तिच्या या पोस्टवर अनेकांच्या सकारात्मक तसेच काही नकारात्मक प्रतिक्रिया आल्या होत्या. पण नुकताच आणखी एक बातमी प्राजक्ताला चर्चेच्या विळख्यात अडकवत आहे.

“महाराष्ट्राची हास्यजत्रा” हा शो आता प्राजक्ता माळी हीने सोडला असल्याची चर्चा होत आहे, काही वर्षांपूर्वी तिने “जुळून येती रेशीमगाठ” या मालिकेतून आपली दमदार ओळख निर्माण केली होती. यामध्ये तिने ललित प्रभाकर यांच्या सोबत तिने काम केले होते. तसेच तिने नुकताच “पावनखिंड” चित्रपटात देखील एक छोटीशी भूमिका बजावली आहे. तिने आपल्या खाजगी जीवनाला प्रकाशात आणत एक पोस्ट देखील शेअर केली होती, ज्यामध्ये ती म्हणते की “एकदा लग्न संस्थेतून मी विवाह करून पाहिला आहे.

त्यामुळे आता प्रेम करूनच मी विवाह करणार आहे आणि माझा हा प्रत्येकासाठी सल्ला आहे.” यावर अनेक नेटकऱ्यांनी टीका केली आहे. प्राजक्ताचे आधीच पहिले लग्न झाले होते, पण काही कारणाने तिचा घटस्फोट देखील झाला आहे. त्यामुळे आता प्रेम करूनच ती विवाह करणार असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. तसेच प्राजक्ता हीने नुकताच “महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे, याचे कारण म्हणजे तिची आई आहे. कोरोना काळ असल्यामुळे त्यांना कुठेच बाहेर फिरायला जाता आले न्हवते त्यामुळे कामातून काहीसा तिने विराम घेतला आहे.

तिने आपल्या आईला महिला दिनाची भेट म्हणून दुबई टूर प्राप्त करून दिली आहे. ती व तिची आई दुबईच्या टूर वर गेले आहेत. त्यामुळे सध्या ती निवांत मस्त जगत असून, आपल्या येत्या क्षणांना भरभरून साद घालत आहे. म्हणून तिने या विनोदी शोमधून सुद्धा काहीसा ब्रेक घेतला आहे, तिची ही टूर अत्यंत सुखदायक ठरो ही सदिच्छा. तिला भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.