यळकोट यळकोट, जय मल्हार! प्राजक्ताने उचलली खंडेरायांची तलवार…

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला सगळा महाराष्ट्र ओळखतो. प्राजक्ताने ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत महाराणी येसूबाई राणीसाहेबांची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे प्राजक्ता अल्पावधीतच घराघरांत जाऊन पोहोचली. तिच्या या भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक झाले आहे. प्राजक्ताने या आधी देखील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेने तिला एक वेगळी ओळख मिळवून दिली.

प्राजक्ता सोशल मीडिया वर बरीच सक्रीय असते. आपले विविध फोटो आणि व्हिडिओ ती चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसते. आता देखील तिने असेच काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. मात्र या फोटो आणि व्हिडिओचे वैशिष्ट्य वेगळे आहे. महाराष्ट्राचे आराध्य खंडेराय यांच्या पावनभूमीत जात प्राजक्ताने खंडेरायांचं दर्शन घेतलं. मात्र या सोबतच तिने एक अचाट गोष्टही करून दाखवली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajakta Gaikwad (@prajaktagaikwad_official)

खंडेरायांच्या जेजुरी गडावर त्यांचं एक सुरेख मंदिर आहे. रोज या मंदिराला हजारो भाविक भेट देत असतात. प्राजक्तानेही भक्तिभावाने खंडेरायांचे दर्शन घेतले. यावेळी तिने मंदिराबाहेर ‘सदानंदाचा यळकोट’ आणि ‘यळकोट यळकोट, जय मल्हार!’ चा उद्घोष करत भंडाराही उधळला. यासोबतच तिने खंडेरायांची ४२ किलो वजनाची खंडा तलवारही उचलली. याचा व्हिडिओ तिने सोशल मीडिया वर शेअर केला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajakta Gaikwad (@prajaktagaikwad_official)

तिच्या या फोटो आणि व्हिडिओ वर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. ‘आता वाटतात खऱ्या राणीसाहेब’, ‘रणरागिणी’, ‘जय मल्हार’, ‘खूपच भारी मोमेंट’, ‘प्राजक्ता एकाच नं.’ अशा कमेंट्सनी प्राजक्ताचा कमेंट बॉक्स भरून वहात आहे. एका चाहत्याने ‘खूपच छान अन लय भारी. प्राजक्ता एवढी 42 किलो ची तलवार उचलणे भयानक अवघड. भल्या भल्यांना उचलता येणार नाही पण तू उचलून दाखवलस. खरज तू खूपच ग्रेट आहेस,’ अशा शब्दांत तिचे कौतुक केले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajakta Gaikwad (@prajaktagaikwad_official)

दुसऱ्या एका चाहतीने ‘नमस्कार ताई … येळकोट येळकोट जय मल्हार…42 किलो वजनाची खंडा तलवार…. कशी उचलली… खरच हे करायला प्रामाणिक भक्ती लागते… ताई तुमच्या धाडसाला तोड नाही…..’ अशा शब्दांमध्ये प्राजक्ता बद्दलचा अभिमान व्यक्त केला आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट बॉक्स मध्ये ‘यळकोट यळकोट, जय मल्हार!’ चा उद्घोष केलेला पाहायला मिळत आहे. प्राजक्ताचे हे धाडस सगळ्यांनाच खूप आवडून गेले आहे. त्या बद्दल तिचे सर्वांकडून कौतुकही होताना दिसत आहे.