म्हणून १० वर्षांनी लहान असलेल्या या विदेशी व्यक्तीशी केले प्रीती झिंटाने लग्न, आता ४६ व्या वर्षी अशी बनली दोन जुळ्या मुलांची आई..

बॉलिवूडमधील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलेली प्रीती झिंटा सध्या चर्चेत आहे. वास्तविक त्यांच्या घरी जुळी मुले जन्माला आली. ती खूप खूश असून तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या पोस्टसाठी प्रितीने आपल्या मुलांचे नाव काय ठेवले आहे हे देखील सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Preity G Zinta (@realpz)


तिने जय झिंटा गुडइनफ आणि जिया झिंटा गुडइनफ अशी मुलांची नावे ठेवली आहेत. प्रितीने आपल्या पोटातून या जुळ्या मुलांना जन्म दिला नसून सरोगसीच्या माध्यमातून त्यांचा जन्म झाला आहे असे सांगितलं आहे. प्रितीने विदेशी उद्योगपती जीन गुडइनफसोबत गुपचूप लग्न केले होते. या लग्नाची माहिती तिने कोणालाही कळू दिली नाही. लग्नानंतर हि तिने आपले लग्न ६ महिने लपवून ठेवलं होते.

प्रीती झिंटाने २९ फेब्रुवारी २०१६ रोजी लॉस एंजेलिसमध्ये एका खाजगी समारंभात आपल्यापेक्षा १० वर्षांनी लहान अमेरिकन नागरिक जीन गुडइनफशी लग्न केले. दोघांनीही गुपचूप लग्न केले होते. लग्नाच्या तब्बल ६ महिन्यांनंतर लग्नाचे फोटो मीडियासमोर आले. त्या काळात प्रिती तिच्या आयुष्यातील काही कठीण टप्प्यातून जात होती आणि त्यामुळे तिने तिच्या लग्नाची गोष्ट गुप्त ठेवली होती.

प्रीती आणि जीन यांची पहिली भेट काही वर्षांपूर्वी अमेरिका दौऱ्यादरम्यान झाली होती. जीन नेहमीच प्रितीला सपोर्ट करतात. २०१५ मध्ये आयपीएल फायनलमध्येही तो प्रितीसोबत होता. नंतर दोघेही अमेरिकेला रवाना झाले.

View this post on Instagram

A post shared by Preity G Zinta (@realpz)

प्रितीचे नाव लग्नाआधी बिझनेसमन नेस वाडियाशी जोडले गेले होते. दोघांमध्ये पाच वर्षे घनिष्ठ संबंध होते. प्रीती फिल्म पार्ट्या, अवॉर्ड फंक्शन्स आणि क्रिकेटच्या मैदानात नेस वाडियाचा हात धरताना दिसली.

मैत्रीपासून सुरू झालेल्या नात्याचे लवकरच प्रेमात रुपांतर झाले. नेसच्या सांगण्यावरूनच प्रितीने बॉलिवूडपासून दुरावल्याचे बोलले जात आहे. जरी नेस वाडियाच्या आईला प्रीती आवडत नव्हती आणि त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता.

एकेकाळी आपल्या अफे’अर’बद्दल मीडियाच्या नजरा चोरणारे हे दोन सेलिब्रिटी आता एकमेकांना दिसतही नाहीत. २००९ मध्ये त्यांच्या ब्रे’क’अ’पची बातमी आली आणि तेव्हापासून नेस आणि प्रिती हे फक्त बिझनेस पार्टनर आहेत. दोघेही सामन्याच्या वेळी उपस्थित असतात, पण एकमेकांकडे ढुंकूनही पाहत नाहीत.

View this post on Instagram

A post shared by Preity G Zinta (@realpz)

प्रीती झिंटाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तिने चित्रपटांपासून नाही तर जाहिरातींमधून सुरुवात केली. १९९६ मध्ये मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत प्रिती एका दिग्दर्शकाला भेटली. त्याची पहिली जाहिरात चॉकलेट ब्रँडची होती. नंतर ती एका साबणाच्या जाहिरातीतही दिसली.

१९९७ मध्ये प्रीती झिंटा एका मैत्रिणीसोबत ऑडिशनसाठी गेली होती, तिची भेट दिग्दर्शक शेखर कपूरशी झाली होती. कपूरने प्रितीला ‘तारा रम पम’ या चित्रपटासाठी साइन केले. मात्र, हृतिक रोशनसोबत बनवण्यात येणारा हा चित्रपट नंतर काही कारणास्तव रद्द करण्यात आला.

यानंतर प्रितीने कुंदन शाहचा ‘क्या कहना’ २०० चित्रपट साइन केला. पण याआधी दिग्दर्शक मणिरत्नमचा ‘दिल से’ १९९८ रिलीज झाला होता आणि हा तिचा डेब्यू चित्रपट होता. तथापि, तिची पहिली मुख्य भूमिका ‘सोल्जर’ १९९८ चित्रपटामध्ये होती.

प्रिती झिंटाने ‘हर दिल जो प्यार करेगा’, ‘कल हो ना हो’, ‘दिल चाहता है’, ‘वीर-जारा’, ‘कोई मिल गया’ आणि ‘हीरोज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती शेवटची ‘भैयाजी सुपरहिट’ (२०१८) चित्रपटात सनी देओलसोबत दिसली होती.