जाणून घ्या स्टार्सच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत! अल्लू अर्जुनकडे आहे सगळ्यांत महागडी व्हॅनिटी व्हॅन…

हल्ली बॉलिवूडसह टॉलिवूड सिताऱ्यांकडेही त्यांची स्वतःची व्हॅनिटी व्हॅन पाहायला मिळते. जगातल्या सगळ्यात महागड्या व्हॅनिटीव्हॅनचे नाव eleMMent Palazzo असून तिची किंमत जवळपास १८ करोड असल्याचे बोलले जाते. ऑस्ट्रियाच्या ‘मार्ची मोबाईल’ तर्फे ही व्हॅन बनवण्यात आली आहे. या व्हॅनची लांबी सुमारे ४० फूट आहे.

अल्लू अर्जुन: दाक्षिणात्य चित्रपटातील ऍक्शन हिरो सुपरस्टार अल्लू अर्जुनची व्हॅनिटी व्हॅनदेखील त्याच्यासारखीच मेगास्टार आणि स्टायलिश आहे. या व्हॅनची किंमत जवळपास ७ कोटी रुपये असल्याचे बोलले जाते. ही व्हॅन रेड्डी कस्टम्स कारवा या कंपनीने डिझाईन केली आहे.

शाहरुख खान: किंग खान शाहरुख कडे Volvo BR९ नावाची व्हॅनिटी व्हॅन आहे. ही व्हॅन १४ मीटर लांब आहे. ही व्हॅन दिलीप छाबडियाने डिझाईन केली असून याची किंमत ५ कोटी रुपये आहे.

सलमान खान: सलमान खानच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत ४ कोटी रुपये आहे. या छोटेखानी घरासारख्या व्हॅन मध्ये दोन रूम्स, हॉल आणि टॉयलेट व बाथरूम आहेत. सलमानची व्हॅनिटी व्हॅनदेखील दिलीप छाबडियाने डिझाईन केली आहे.

संजय दत्त: बॉलिवूड स्टार संजय दत्तकडे Van AXL नावाची व्हॅनिटी व्हॅन आहे. ही व्हॅन रोझ बॉस या कंपनीने डिझाईन केली आहे. या व्हॅनची किंमत जवळपास ३.१५ कोटी रुपये इतकी आहे. या व्हॅनचे डिझाईन ‘द एअरफोर्स १’ वर आधारीत आहे.

हृतिक रोशन: हृतिककडे मर्सिडीज व्ही-क्लास ही व्हॅनिटी व्हॅन आहे. ३ कोटी रुपयांच्या या व्हॅनिटी व्हॅनचे ३ भाग आहेत. १२ मीटर लांबीच्या या व्हॅनिटी मधील पहिल्या भागात ऑफिस, दुसऱ्या भागात हृतिकची बेडरूम आणि तिसऱ्या भागात टॉयलेट व बाथरूम आहे.

अजय देवगण: अजय देवगणला महागड्या कार्सचा शौक आहे. त्याच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत जवळपास ३ कोटी रुपये आहे.

अक्षय कुमार: खिलाडी कुमारच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत आहे २.९ कोटी रुपये. अक्षयची ही आलिशान व्हॅनिटी १४ मीटर लांब आहे.

रणबीर कपूर: रणबीरच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत २.६ कोटी रुपये आहे. या व्हॅनिटी मध्ये बेडरूम, टॉयलेट, बाथरूमसह एक गेमिंग झोन देखील बनवण्यात आला आहे.

रितेश देशमुख : रितेशच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत २.५ कोटी रुपये आहे. रितेशच्या व्हॅनिटी व्हॅनचे वैशिष्टय म्हणजे यात बेडरूम, टॉयलेट, वॉशरूम याबरोबरच लहान मुलांसाठी एक बेबी रूम देखील आहे.

दीपिका पदुकोण: दीपिकाच्या व्हॅनिटीची किंमत २ कोटी रुपये आहे. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये तीन भाग असून एका भागात प्रायव्हेट झोन, दुसऱ्या भागात सीटिंग एरिया तर तिसऱ्या भागात स्टाफ एरिया सुद्धा बनवलेला आहे.