या मोठ्या कारणामुळे हा अभिनेता कुटुंबासह भारत सोडून होणार दुबई मध्ये शिफ्ट..म्हणाला..

दाक्षिणात्य अभिनेता आर माधवन याने ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आपल्या पदार्पणातील चित्रपटानेच त्याने हिंदी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. आजही हा चित्रपट अनेक प्रेक्षकांचा आवडता चित्रपट आहे. यातील गाणी अजूनही लोकांच्या ओठांवर असतात. आर माधवनने हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी छाप पाडली आहे. मात्र आता हा गुणी अभिनेता भारत सोडणार असल्याची बातमी समोर येत आहे.

बॉलिवूड हंगामा या वेबसाईटवरील माहितीनुसार, आर माधवन भारत सोडून दुबईला शिफ्ट होणार आहे. आर माधवनचा मुलगा वेदांत हा उत्तम जलतरणपटू आहे. काही दिवसांपूर्वी बंगळूर येथे राष्ट्रीय स्तरावर जलतरण स्पर्धा घेण्यात आली होती. या ४७ व्या ज्युनियर नॅशनल ऍक्वाटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत वेदांतने महाराष्ट्रासाठी तब्बल सात पदके जिंकली होती. यामध्ये त्याने ८०० मीटर फ्री स्टाईल स्विमिंग, १५०० मीटर फ्री स्टाईल स्विमिंग, ४x १०० मीटर फ्री स्टाईल स्विमिंग आणि ४x२०० मीटर फ्री स्टाईल स्विमिंग रिले या स्पर्धांमध्ये कांस्य पदकांची कमाई केली होती. तर १०० मीटर, २०० मीटर आणि ४०० मीटर फ्री स्टाईल स्विमिंग मध्ये त्याने रौप्य पदकांची कमाई केली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

वेदांत आता ऑलिम्पिक स्पर्धांसाठी तयार करत आहे. वेदांतच्या या कौशल्यांमुळे आर माधवन त्याला आणि त्याच्या स्वप्नांना पाठींबा देताना दिसत आहे. येत्या २०२६ मधील ऑलिम्पिक स्पर्धांसाठी वेदांत जोरदार तयारी करत आहे. मात्र सध्या भारतात इतक्या मोठ्या जलतरण तलावांची कमतरता आहे. जे तलाव उपलब्ध आहेत, ते सध्या कोरोनामुळे बंद ठेवण्यात आले आहेत. अशावेळी वेदांतच्या सरावामध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

मात्र सध्या भारतात हे तलाव वापरासाठी बंद असले तरी इतर देशांमध्ये ते उपलब्ध आहेत. दुबईला असे मोठे जलतरण तलाव सहजी उपलब्ध होताना दिसत आहेत. त्यामुळे वेदांतच्या सरावासाठी अभिनेता आर माधवन आपली पत्नी सरिता आणि मुलगा वेदांतसह लवकरच दुबईला शिफ्ट होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता लवकरच वेदांत माधवनला आपण पुढच्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेताना पाहू शकणार आहोत. आपल्या मेहनतीने तो अनेक पदकांवर आपले नाव कोरले यात शंका नाही.

तुमच्या आवडत्या कलाकारांचे असेच काही अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया पेजेसना जरूर फॉलो करा. तसेच तुम्हाला आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका.