अश्लिल चित्रपट प्रकरणी राज कुंद्राने मुंबई क्राईम ब्रांचला दिली होती इतक्या लाखांची ला’च, या आरोपीने केला मोठा खु’लासा..

मुंबई: बॉलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योगपती राज कुंद्राला अ’श्लील चित्रपट तयार केल्याप्रकरणी १९ जुलै २०२१ रोजी अट’क करण्यात आली. मात्र, राज कुंद्रा याप्रकरणी अटक टाळण्यासाठी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचला तब्बल २५ लाख रुपयांची ला’च दिल्याचा दावा याप्रकरणातील आरोपीने केला आहे.

राज कुंद्रानं अट’क टाळण्यासाठी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचला 25 लाख रुपयांची ला’च दिली असल्याचा दावा या प्रकरणातील आरोपीने केला आहे. त्यासोबतच या प्रकरणात अरविंद श्रीवास्तव उर्फ यश ठाकूरसुद्धा आ’रोपी आहे. त्याने ईमेलच्या मदतीने मार्च महिन्यात एसीबीला याबाबतची तक्रार केली होती.

त्यावेळी एसीबीकडून ही तक्रार मुंबई पोलीस कमिश्‍नर ऑफिसला एप्रिलमध्ये पाठविण्यात आली होती. परंतू, शहरातील पोलीस अधिकारी यावर कुठलीही प्रतिक्रिया देत नाहीत. क्राइम ब्रांचने बुधवारी राज कुंद्राच्या अंधेरीतील कार्यालयावरही छापा टाकला आहे.

अरविंद श्रीवास्‍तव याची ‘फ्लिज मूव्हीज’ नावाची फर्म होती. मात्र, यापूर्वीचे तिचे नाव ‘न्‍यूफ्लिक्‍स’ होते. या फर्मचा संबंध अमेरिकेशी असून, या फर्मकडून मार्चमध्ये तक्रार केली होती. तर, मार्चमध्ये पोलिसांनी या फर्मचे नाव देखील नोंदवले होते. या फर्मचे मालक अरविंद श्रीवास्‍तवचे दोन बँक अकाउंट सीझ केले असून, या अकाउंट्सवर तब्बल ४.५ कोटी रुपये होते.

दरम्यान, राज कुंद्रा आणि त्याचा बिझनेस पार्टनर उमेश कामत सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान क्राईम ब्रांचनं उमेशच्या ऑफिसवर छा’पा मारला होता. हॉ’ट शॉट ॲपवर अपलोड केलेल्या २० मिनिटांपासून ३० मिनिटांपर्यंतचे एकूण ९० व्हिडिओ गुन्हे शाखेने जप्त आहेत.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.