यूपीतील छोट्या गावातून आलेले राजपाल यादव आज खऱ्या आयुष्यात जगतात आलिशान जीवन, मिळवली आहे करोडोंची प्रॉपर्टी…

अभिनयात उंची गाठण्यासाठी नव्या कलाकारांना खूप सारी मेहनत घ्यावी लागते कष्टातून स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्यासाठी हव्या त्या ठिकाणी काम करून पोटाची गरज भागवून हवं ते बोलून घेऊन शिकावे लागते आज आम्ही बॉलिवूडमधील अशाच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत जो कष्टातून आणि छोट्या गावातून बाहेर पडून स्वतःला जगाच्या समोर ठेवत हा अभिनेता यशस्वी झाला. हा अभिनेता आहे तुमचा आमचा सर्वांचा आवडीचा राजपाल यादव!

View this post on Instagram

A post shared by Rajpal Naurang Yadav (@rajpalofficial)

हिंदी चित्रपटसृष्टीतील ते कलाकार ज्यांनी आपल्या दमदार कॉमेडीच्या जोरावर चित्रपट विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या कॉमिक टायमिंगने आणि आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकणारा अभिनेता राजपाल यादवने टीव्ही ते चित्रपट असा एक चांगला प्रवास केला आहे. राजपाल यादवने दूरदर्शनच्या मुंगेरी के भाई नौरंगीलाल या मालिकेत काम केले होते. त्यानंतर त्यांनी कॉमेडीकडे लक्ष वळवले.

हंगामा, रेस अगेन्स्ट टाइम, चुप चुप के, गरम मसाला, फिर हेरा फेरी, ढोल यांसारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. आज फिल्मी दुनियेत राजपाल यादवला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ सक्रिय असलेला राजपाल यादव राजेशाही जीवनशैली राखतो. तुम्हाला माहीत आहे का लोकांना हसवणारा राजपाल आज करोडोंचा मालक बनला आहे.

View this post on Instagram

A post shared by Rajpal Naurang Yadav (@rajpalofficial)

Caknowledge.com च्या रिपोर्टनुसार, राजपाल यादवची एकूण संपत्ती ५० कोटी रुपये आहे. २०२१ मध्ये त्यांची एकूण संपत्ती $७ दशलक्ष असल्याचे सांगितले जाते. त्याच्या कमाईचा मुख्य स्त्रोत म्हणजे ब्रँड एंडोर्समेंट आणि चित्रपट. राजपाल यादव एका महिन्यात ३० लाखांहून अधिक कमावतो आणि वर्षभरात त्याची कमाई सुमारे ४ कोटी रुपये आहे.

राजपाल यादव आलिशान घरात राजाप्रमाणे राहतो. तो अनेक रिअल इस्टेट मालमत्तेचा मालक आहे. इतकंच नाही तर राजपाल यादव कार कलेक्शनला महागड्या आणि रॉयल गाड्यांचंही खूप शौक आहे. त्याच्याकडे Honda Accord, BMW 5 Series सारखी इतर वाहने देखील आहेत. तर तुम्हाला राजपाल यादव कसे वाटतात आम्हाला नक्की कळवा.