ना चित्रपटात काम, ना जाहिरातीमध्ये, तरीही राखी सावंत कमावते इतके, आहे इतक्या संपत्तीची मालकीण..

ड्रामा क्वीन म्हटलं की डोळ्यांसमोर नाव येतं ते राखी सावंतचं. आपल्या कामापेक्षा इतर गोष्टींमुळेच ती नेहमी चर्चेत राहिली आहे. तिचे वादग्रस्त दावे, तिचं लग्न, तिचे कपडे, तिचं बोलणं, तिचं वागणं या सगळ्याच गोष्टींची चर्चा होताना दिसते. नुकताच तिने आपला ४३ वा वाढदिवस साजरा केला. सध्या ती कोणत्याही चित्रपटात किंवा जाहिरातीत काम करताना दिसत नाही. तरीही तिचे घर कसे चालते, असा प्रश्न पडणं साहजिक आहे.

राखी सावंतचं खरं नाव नीरू भेडा आहे. चित्रपटसृष्टीत काम करायला सुरुवात केल्यावर तिने राखी सावंत हे नाव लावायला सुरुवात केली. २५ नोव्हेंबर १९७८ रोजी तिचा जन्म झाला. सावंत हे तिच्या सावत्र वडीलांचे आडनाव आहे. १९९७ मध्ये ‘अग्निचक्र’ या चित्रपटातून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने जोरू का गुलाम (२०००), जिस देश में गंगा रहता है (२०००), ये रास्ते है प्यार के (२००१), मस्ती (२००४), मैं हूँ ना (२००४) सारख्या चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका निभावल्या.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

२००३ मध्ये तिने ‘चुरा लिया है तुमने’ या चित्रपटात ‘मोहोब्बत है मिरची’ हे पहिले आयटम सॉंग केले होते. तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘परदेसिया ये सच है पिया’ या प्रसिद्ध गाण्याच्या रिमिक्स मध्ये. या रिमिक्स गाण्याच्या म्युझिक व्हिडिओ मध्ये तिने काम केले होते. आपल्या हॉट अदांनी तिने रिमिक्स गाण्यांच्या प्रेक्षकांना वेड लावले होते. त्यानंतर तिने बरेच आयटम सॉंग्स केले. त्यामुळे ती इंडस्ट्री मध्ये ‘आयटम गर्ल’ म्हणून ओळखली जाऊ लागली.

अलीकडे ती कोणत्याही चित्रपटात दिसत नसली तरी तिच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. एका रिपोर्टनुसार, तिच्याकडे ३७ कोटींची संपत्ती आहे. तिचे मुंबई मध्ये दोन फ्लॅट असून त्यांची किंमत देखील कोटींमध्ये आहे. काही रिपोर्टनुसार, तिच्याकडे ११ कोटींचा एक बंगलाही आहे. याशिवाय, फोर्ड की एव्हेंडर आणि फोक्सवॅगन पोलो या कार देखील आहेत. कोणत्याही चित्रपटात काम न करता तिने एवढी संपत्ती कशी कमावली, असा प्रश्न वाचकांना पडणं स्वाभाविक आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

तर अशा राखी सावंतच्या उत्पन्नाचा स्रोत आहे स्टेज शो आणि रिऍलिटी शो. राखीला आपण अनेक रिऍलिटी शो मध्ये हजेरी लावताना पाहिले आहे. तसेच ती देशविदेशात स्टेज शो करत असते. राखी सावंत एक डान्सर आहे आणि त्याचा फायदा तिला असा होताना दिसत आहे.