लग्नानंतर हनिमून एन्जॉय करतेय हि मराठमोळी अभिनेत्री, हॉट फोटो पाहून नेटकऱ्यांनी मात्र केलं ट्रो’ल..

काही दिवसांपूर्वीच ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनीलने आपला बॉयफ्रेंड आदित्य बिलागी सोबत लग्नगाठ बांधली. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनायाच्या भूमिकेने रसिकाला घराघरात ओळख मिळवून दिली. या मालिकेतील भूमिकेमुळे तिच्या चाहत्यांमध्ये भर पडली. हे चाहते तिला तिच्या सोशल मीडिया वर फॉलो करतात आणि तिच्याबद्दलचे अपडेट्स जाणून घेत असतात. रसिका सोशल मीडिया वर फारच सक्रीय असते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aditya Bilagi (@adi_bilagi)

रसिका नेहमी कोणते ना कोणते तरी फोटो सोशल मीडिया वर अपलोड करताना दिसते. मग ते तिचे स्वतःचे असतील, तिच्या नव्या फोटोशूटचे असतील, कधी तिच्या एखाद्या नवीन छंदाचे अपडेट असतील, कधी तिच्या कुत्र्याचे फोटो असतील, तर कधी बॉयफ्रेंड बरोबरचे फोटो असतील, रसिका नेहमीच सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह असते. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी रसिकाने तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागी सोबत गोव्याला डेस्टिनेशन वेडींग केले. तेथील धमाल आणि आपल्या लग्नविधींचे फोटोही तिने सोशल मीडिया वर शेअर केले होते.

सध्या ती मालदीव मध्ये आपला हनिमून एन्जॉय करते आहे. तेथील वेगवेगळे फोटो ती सोशल मीडिया वर शेअर करताना दिसत आहे. यातीलच एका फोटो वरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. या फोटोमध्ये तिने एक लॉंग शर्ट घातला आहे. मागे पसरलेला समुद्र आणि त्यासमोर हॉट अँड बोल्ड रसिका हे दृष्य खूपच सुंदर दिसत आहे. या शर्ट मध्येच तिने वेगवेगळ्या पोजेस दिलेल्या पाहायला मिळतात. रसिकाने एका फोटोला कॅप्शन देत म्हटलं आहे, ‘त्याच्या कपड्यांसोबतची स्टाईल. थँक्यू आदित्य, मला तुझा शर्ट घालायला दिल्याबद्दल.’ मात्र या फोटोवरून ती ट्रोल होताना दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

अनेकांनी तिच्या सौंदर्याची स्तुती केली असली, तरी काहींनी मात्र तिच्या कपड्यांवरून तिला टोमणे मारले आहेत. ‘पँट घालायला विसरलीस का?’ असे एका नेटकऱ्याने विचारले आहे. तर एकाने ‘हा आदित्यचा शर्ट का?’ असे विचारले आहे. तिच्या चाहत्यांनी मात्र तिचा कमेंट बॉक्स स्तुतिसुमनांनी भरून टाकला आहे. हॉट, गॉर्जस, ब्युटीफुल अशा शब्दांत चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

रसिकाने मालिकेबरोबरच काही चित्रपटांमध्येही काम केलेले पाहायला मिळते. तिने पोस्टर गर्ल, गॅटमॅट, बघतोस काय मुजरा कर अशा चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘पोस्टर गर्ल’ चित्रपटातील तिची लावणी खूपच लोकप्रिय झाली.