या करोड़पति व्यावसायिकाची मुलगी आहे रवींद्र जडेजाची पत्नी, लग्नाधीच जावयाला दिली होती १ कोटीची ऑडी भेट..

भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा बद्दल बोलवे तितके कमीच आहे. त्याचे समर्पण आणि निश्चय खरोखरच कौतुकास्पद आहे. तो लहानपणापासूनच आणि त्याच्या संपूर्ण काळापासून क्रिकेटशी एकनिष्ठ होता. रवींद्र जडेजाने २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि गोलंदाजीबरोबरच फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही तो माहीर झाला.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलग तीन तिहेरी शतके ठोकणारा तो पहिला भारतीय आणि आठवा क्रिकेटपटू आहे. क्षेत्ररक्षणात त्याची गणना जगातील अव्वल स्थानी केली जाते.

परंतु फारच कमी लोकांना जड्डूच्या वैयक्तिक जीवनाबद्दल माहिती आहे. जड्डू अगदी साधी मुलगी आवडली. पण त्याने फक्त त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित केले. एकदा त्याची बहीण नयनाने त्याला तिला भेटायला सांगितले. बरेच काही बोलल्यानंतर त्याने अनिच्छेने त्या मुलीला भेटायला तयार झाला.

पाहताच जडेजा त्या मुलीवरती फि’दा झाला होता. ही मुलगी दुसरी कोणी नसून रीवा सोलंकी होती. रीवाला पाहून जडेजाला वाटले की ही तीच मुलगी आहे जिला आपले जीवन साथीदार बनवायचे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravindra jadeja (@ravindra.jadeja)

एका मुलाखतीत रवींद्रने सांगितले होते की त्याला रीवा पहिलीच भेटी मध्ये आक’र्षक, सुशिक्षित आणि हुशार वाटली होती. जडेजाला त्या मुलींमध्ये सर्व गुण मिळाले होते. पहिल्या भेटीनंतर दोघांनी एकमेकांशी आपले फोन नंबर शेअर केले आणि संपर्कात राहिले. दोघेही लवकरच एकमेकांच्या अगदी जवळ आले. काही महिन्यांतच त्यांना खात्री झाली की ते खरतर एकमेकांचे जीवन साथीदार आहेत. २०१६ साली दोघांनी हि लग्न करण्याचा निर्णय घेतला.

रेवा सोलंकी ही राजकोटचे कंत्राटदार आणि लक्षाधीश व्यावसायिकी हरदेवसिंग सोलंकी यांची एकुलती मुलगी आहे, त्यांच्याकडे दोन खासगी शाळा आणि एक हॉटेल आहे, रीवाचे काका हरीसिंग सोलंकी गुजरात कॉंग्रेसचे मोठे नेते आहेत.

रेवाची आई प्रफुल्लबा राजकोट रेल्वेमध्ये मोठ्या पदावरती कार्यरत आहे. रीवा तिच्या आई-वडिलांची लाडकी मुलगी आहे. त्याचे कुटुंब राजकोटच्या कलावाद रोडवर असलेल्या सरिता विहार सोसायटीत राहते. दुसरीकडे रेवाच्या शिक्षणाबद्दल बोलताना तिने मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केले आहे, त्यानंतर ती यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीत आली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravindra jadeja (@ravindra.jadeja)

विशेष म्हणजे, जडेजा आणि रीवाचे लग्न १७ एप्रिल २०१६ रोजी झाले होते, तेव्हा जडेजाला लग्नाआधीच रिवाचे वडील सासरे यांनी जवळपास १ कोटीची ऑडी क्यू ७ कार भेट म्हणून दिली होती. इतकेच नाही तर जडेजाचे लग्नही अतिशय आलिशान आणि शाही मार्गाने झाले होते. तीन दिवस चाललेल्या या विवाह सोहळ्यात कोट्यावधी रुपये खर्च झाले होते.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.