Remo D’souza च्या मेव्हण्यानी केली आत्महत्या! बहीण लिजेलने केला मोठा धक्कादायक खुलासा….

मित्रांनो काही वेळापूर्वीच बॉलिवूडमधुन एक दुःखद बातमी येऊन पोहचली आहे. बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजा यांचा मेव्हणा जॅसन वॉटकिंस याचा राहत्या घरी मृतदेह आढळला आहे. ही माहिती न्यूज मीडिया लाईनला लागतच सगळीकडे नुसती खळबळ उडाली आहे. पण या घटनेबद्दलचे धक्कादायक खुलासे नुकताच रेमोची पत्नी लिजेलने व्यक्त केले आहेत. तिने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. पोलिसांच्या चौकशीत एक मोठी बाब समोर आली आहे याच बरोबर रेमोची पत्नी लिजेलने देखील एक मोठा खुलासा केला आहे.

ती म्हणाली की ‘ जॅसनला गांजाचं व्यसन खूप होतं, नुकताच तीन वर्षापूर्वी आईचं निधन झाल्याचं लिजेलने सांगितलं. आईचे निधन झाल्याचे समजताच भाऊ जॅसनला मोठा मानसिक धक्का बसला होता. असा खुलासा त्यांनी केला होता.’ आईच्या निधनानंतर त्याची मानसिक स्थिती खूपच बिघडली होती. त्याने अजून लग्न देखील केले नव्हतं.तो माझ्या आईच्या जवळ खूप होता. परंतु आईच्या अचानक जाण्याने तो खूपच निराशेत पडला होता. याच दरम्यान त्याला गांजाचे व्यसन लागले होते. याच व्यसनात असताना त्याने स्वतःसोबत बरं वाईट काही केला असेल अशी शक्यता रिमोची पत्नी लिजेलने सांगितली.

जॅसननेदेखील चित्रपट क्षेत्रात काम केल आहे.तो रेमोचा चित्रपट असिस्ट करत होता. आपल्या भावाच्या निधनामुळे रेमोची पत्नी लिजेलला मोठा धक्का बसला आहे. लिजेल डिसूजा हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर भावाचा फोटो शेअर करत दुःख व्यक्त केले आहे. ईटाइम्स च्या माहितीनुसार जॅसनचा मुंबईतील राहत्या घरी मृतदेह आढळला आहे. मेडिकल अधिकाऱ्यांनी सांगितले की त्याला कूपर रुग्णालयात त्वरित आणले होते. पण आपल्या भावाच्या निधनामुळे रेमोच्या पत्नीला सांभाळणं खूपच अवघड गेलं.

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो यांची पत्नी लिजेलने आपल्या भावासोबतचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जॅसन आपल्या आईसोबत रिक्षात बसला आहे. लिजेलने त्याची माफी मागत लिहिलं की, सॉरी आई मी खरी उतरू शकले नाही. रेमो डिसूजा या दिवसात आपल्या मित्राच्या लग्नासाठी गोव्यात गेले होते. रेमो आणि त्यांची पत्नी याच आठवड्यात एअरपोर्टवर निदर्शनास आले होते. अचानक या गोष्टीमुळे सर्वत्र खळबळ मात्र उडाली आहे. हे नक्की.