हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर, यांच्याकडे आहे करोडोंची संपत्ती..सचिनची संपत्ती जाणून धक्का बसेल..

आपण भारतीय आपल्या देशभक्ती दाखवण्याच्या आलेल्या संधीला सोडत नाही. देशप्रेमात आपण खूप वेडे आहोत. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज यांचा मान राखणं आपलं कर्तव्य आहेच कायम आपण ते पाळतो आणि राष्ट्रगीत म्हणताना, राष्ट्रध्वजाला सलामी देताना आपली छाती अभिमानाने फुलून येते. बरं हे जर सगळं क्रिकेटच्या मैदानात होत असेल तर विचारायलाच नको. कारण देशप्रेम या विषयानंतर भारतीयांचे क्रिकेटप्रेम जगजाहीर आहे.

क्रिकेट हा आपल्याकडे धर्म आहे. भारतीय लोक क्रिकेटसाठी खरंच वेडे आहेत. क्रिकेटबद्दल हरेक गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकांना खूप हौस आहे. भारतीय क्रिकेटपटूंचे जगभरात चाहते आहेत. तर आज आपण जाणून घेणार आहोत, कोण आहेत भारतातले सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू….

क्रिकेटचा विषय आहे आणि सुरुवात कोणाच्या नावापासून होणार हे सांगण्याची गरज आहे का? सुरुवातीलाच हे नाव येणं खूप स्वाभाविक आहे. ते म्हणजे क्रिकेटचा देव (God Of Cricket) सचिन रमेश तेंडुलकर. (Sachin Tendulkar) हा देव म्हणून पुजला जातो, पण त्याला तेंडल्या या प्रिय नावानं बोलावलं जातं. तर सचिनची एकूण संपत्ती आहे १११० करोड. अहो मुंबईच्या त्याच्या घराची किंमतच नुसती ८० करोड आहे.

आता दुसऱ्या स्थानावर कोण हेही सांगण्याची गरज नसावी. या स्थानावर भारताचा आजवरचा सर्वात यशस्वी कप्तान (Captain Cool) महेंद्रसिंह धोनी (M.S.Dhoni). माही या टोपणनावाने तो प्रसिद्ध आहे. माहीने नुकतीच १५ ऑगस्ट २०२० ला निवृत्ती जाहीर केली आहे. माहीची संपत्ती ७८५ कोटी ₹ आहे. धोनी विविध कंपन्यांच्या जाहिराती करताना दिसतो, तसेच काही कंपन्यांच्या मालकीत त्याची हिस्सेदारी आहे.

आता तिसऱ्या स्थानावर असलेला खेळाडू जो आहे, त्याच्याकडून भारतीय क्रिकेट रसिकांना खूप अपेक्षा आहेत. तो धोनीची गादी जरी चालवत असला तरी अजूनही मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवण्यासाठी धडपड करत आहे.

क्रिकेटच्या देवाचे विक्रम मोडण्याची क्षमता असणारा तो प्रतिभावान खेळाडू आहे. तुम्हाला नाव कळलं असेलच विराट कोहली (Virat Kohali). भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कप्तान हा भारतातला तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत क्रिकेटपटू आहे. त्याची एकूण संपत्ती ७७० करोड ₹ आहे. आता विराटचं वय हे ३२ आहे. येत्या काळात तो संपत्तीचा तेंडुलकरचा विक्रम ही मोडू शकतो.

चौथं नाव ते आहे ज्या व्यक्तीने भारतीय संघाला जिंकण्याची सवय लावली. तसेच परदेशात जाऊनही भारतीय संघ यजमान संघाला नमवू शकतो, हे दाखवून दिलं. जागतिक क्रिकेट मध्ये भारताची दादागिरी काय असते हे दाखवलं…तो म्हणजे दादा उर्फ बंगाल टायगर उर्फ सौरव गांगुली (Saurav Ganguly). दादा आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI चा अध्यक्ष आहे. दादाकडे ४१६ कोटी ₹ इतकी संपत्ती आहे.

पाचवा क्रमांक आहे तो म्हणजे भारताचा माजी पण धडाकेबाज फलंदाज सहवागचा (Virendra Sehwag). मुलतानचा सुलतान अशी त्याची ओळख आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे. बॅटची धार त्याने दाखवलीच पण सध्या तो समालोचनाद्वारे शब्दांची धार दाखवतो आहे. त्याची संपत्ती आहे. २८६ कोटी ₹ आहे.

सहावा क्रमांक आहे तो युवीचा (Yuvraj Singh). सहा नंबर म्हणलं की आपल्याला थेट आठवतो तो २००७ चा २०-२० विश्वचषक. फ्लिंटॉफ शी (Andrew Flintoff) झालेली बाचाबाची आणि ब्रॉड (Stuart Broad) ला ठोकलेले सहा षटकार. षटकार आणि युवीचं नातं अतूट आहे. २००७ असो की २०११ चा विश्वचषक, युवीचीच हवा होती. युवी पाजींकडे आहे २५५ कोटींची संपत्ती.

सातव्या स्थानावर आहे भारताचा माजी खेळाडू, एक तगडा क्षेत्ररक्षक व जबरी फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina).रैनाच्या चपळाईला तोड नाही. तो धोनीचा खास माणूस. त्यानेही धोनी सोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केला. पण संपत्तीच्या रैनाही काही कमी नाही. त्याच्याकडे १८५ कोटी ₹ ची संपत्ती आहे.

ज्याला राजस खेळ पहायचा आहे, त्याने द्रविडचा (Rahul Dravid) खेळ पहावा. द्रविडचा खेळ पाहणे ही दर्दी क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणी असते. त्याचे straight shots पाहणं म्हणजे ओठातून अहाहा असंच बाहेर पडतं. एकदा का त्याने मैदानावर त्याने नांगर टाकला की विरोधी टीमच्या गोलंदाजाला घाम फुटायचा. द्रविडला कसोटी क्रिकेट मध्ये गोलंदाजी (Bowling) करणं म्हणजे गोलंदाज आधीच तणावात यायचे. म्हणून द्रविडला ‘The Wall’ म्हणतात. द्रविड हा या यादीमधला आठव्या क्रमांकाचा क्रिकेटपटू आहे. द्राविडकडे १७२ कोटी ₹ इतकी संपत्ती आहे.

ज्याच्या नावातच हिट आहे, असा रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणजे टीम इंडियाचा हिटमॅन (Hitman). एक विस्फोटक फलंदाज म्हणून रोहितची ओळख आहे. रोहितच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका खेळीत सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. IPL मध्ये ही तो सर्वाधिक यशस्वी कप्तान आहे. श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत तो नवव्या स्थानावर आहे. १६० कोटी ₹ संपत्ती रोहितकडे आहे. नुकताच त्याने २६ कोटी ₹ आपला बांगला विकला.

जो संघात असताना पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असायचा म्हणजे ओपन करायचा तो गौतम गंभीर (Gautam Gambhir), या यादीत शेवटच्या स्थानावर आहे. गंभीरचं भारतीय क्रिकेटसाठी योगदान मोठं आहे. विश्वचषक २०११ च्या शेवटच्या सामन्यात विजयाचा पाया गौतम गंभीरने रचला आहे. त्याच्या ९७ धावांमुळे भारताला विजयाच्या जवळ जाता आलं. पूर्वीचा क्रिकेटपटू आता भारतीय जनता पक्षाकडून दिल्लीतील खासदार (Member Of Parliament) आहे. तर या खेळाडू लोकसभा सदस्यांच्याकडे १४७ कोटी ₹ इतकी संपत्ती आहे.