रिंकू राजगुरुने केला मोठा खु’लासा, बॉ’य’फ्रेंड आहे का प्रश्नावर दिले उत्तर, म्हणाली…

नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपसृष्टीतील प्रचंड नामांकित झालेला चित्रपट ‘सैराट’. या सैराट चित्रपटाने केवळ मराठी चित्रपट सृष्टीलाच वेड लावलं नाही तर, संपूर्ण बॉलीवूडला देखील वेड लावलं आहे. या चित्रपटामध्ये ‘आर्ची’ या पात्राची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने सैराटमधूनच चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.

रिंकू राजगुरू सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव असते. ती नेहमीच तिच्या सोशल अकाउंट वरून काहीना काही चाहत्यांबरोबर शेअर करत असते. त्यामध्ये रिंकू तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. ती कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. रिंकू राजगुरूचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.

सैराट चित्रपटात बिनधास्त परशाला प्र’पोज करणारी आर्चीचा खऱ्या आयुष्यातील परशा कोण असेल हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते प्रचंड उत्सुक असतात. आता तिच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. तिने आपल्या ल’व्ह लाईफ बद्दल चाहत्यांबरोबर मोठा खु’लासा केला आहे.

रिंकू राजगुरुला सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांबरोबर वेगवेगळे सेशन घेत असते. अशाच एका सेशनमध्ये रिंकू रजगुरुला तिच्या लव्ह लाईफबद्दल तिच्या चाहत्यांनी प्रश्न विचारले. तेव्हा तिच्या एका चाहत्याने “तुला बॉ’य’फ्रेंड आहे का?” असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला रिंकू रजगुरुने बिनधास्त उत्तर दिले आहे.

रिंकू राजगुरुने नुकतच एक #askmeanything  हे आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सेशन घेतल आहे. त्यामध्येच तिच्या चाहत्यांनी तिला वेगवेगळे प्रश्न विचारले. तिच्या चाहत्यांनी रिंकू रजगुरुची आवड निवड विचारली. तिला कोणता पदार्थ खायला आवडतो. तसेच कोणत्या ठिकाणी फिरायला जायला आवडते. असे तिच्याबद्दल अनेक प्रश्न विचारले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

एका चाहत्याने तिला लव्ह लाईफबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत रिंकू राजगुरू म्हणाली की, “नो” असे म्हणाली. म्हणजेच रिंकू राजगुरुला तिच्या आयुष्यातला परशा अद्यापही मिळालेला नाही. तिने एका शब्दात तिच्या लव्ह लाईफबद्दल उत्तर दिलं आहे.

रिंकू राजगुरुच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल, तर तिचा आगामी मराठी चित्रपट ‘छूमंतर’ यामध्ये झळकणार आहे. तिच्या या चित्रपटाच शूटिंग लंडनमध्ये झाल आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आणखी स्टार दिसणार आहेत. प्रार्थना बेहेरे, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना हे स्टार या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर, आता रिंकूच्या चाहत्यांना ती या चित्रपटात कोणती भूमिका साकारताना दिसणार आहे. याची आस लागली आहे. तिचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.