आमिर खानच्या लेकीची रोमँटिक ख्रिसमस पार्टी! बॉयफ्रेंडला किस करतानाचे फोटो व्हायरल…

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान नेहमीच प्रसार माध्यमांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो. त्याची लेक मात्र सोशल मीडिया वर बरीच सक्रीय असलेली दिसते. आमिरची मुलगी आयरा खान सोशल मीडिया वर बरीच सक्रीय असते आणि ती नेहमी आपल्या खासगी आयुष्यातील काही क्षण सोशल मीडिया वर शेअर करताना दिसते. आताही तिने तिच्या ख्रिसमस सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडिया वर शेअर केले आहेत. या फोटोंमुळे सध्या ती बरीच चर्चेत आहे.

आयरा गेला काही काळ तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेला डेट करत आहे. अनेक वेळा ती सोशल मीडिया वर आपल्या या बॉयफ्रेंड बरोबरचे फोटो शेअर करताना दिसते. यावेळीही तिने आपल्या बॉयफ्रेंड सोबत ख्रिसमस सेलिब्रेशन केले आहे. त्याचे फोटो तिने सोशल मीडिया वर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हे लव्हबर्ड्स एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

आयराने पांढऱ्या रंगाचा वुलन क्रॉप टॉप घातला असून त्यावर तिने हिरव्या निळ्या रंगाचा चेक्स प्रिंट मिनी स्कर्ट घातला आहे. काळ्या लेदर जॅकेटसह तिने कानात ख्रिसमस ट्री इअररिंग आणि डिअर हेडबँड देखील परिधान केलेला पाहायला मिळतो आहे. तर नुपूर देखील नेव्ही ब्लू रंगाचा शर्ट, काळी पँट, काळी टोपी, लाल रंगाचे सस्पेंडर आणि गळ्यात बो अशा स्टाईल मध्ये दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

एका फोटोमध्ये दोघेही एकमेकांकडे बघून हसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही कॅमेऱ्याकडे बघून पोज देत असल्याचे दिसते. एका फोटोमध्ये आयरा नूपुरच्या गालाचे चुंबन घेताना दिसत आहे. या दोघांचे हे फोटो सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहेत.

नुपूर हा व्यवसायाने फिटनेस ट्रेनर आहे. तो आयराचे वडील आमिर खान यांचा ट्रेनर आहे. तसेच त्याने अनेक वर्ष अभिनेत्री सुश्मिता सेनलाही ट्रेन केलं आहे. आयरा ही आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ताची मुलगी आहे. ती चित्रपटसृष्टीपासून लांब असते. तिने आपल्या वाढदिवसादिवशी ‘अगेत्सु फाउंडेशन’ ही संस्था सुरू केली आहे. सध्या ती त्याचे काम पहात आहे.

तर मंडळी, तुम्हाला आयरा आणि नुपूरच्या या ‘कपल गोल्स’ फोटोंबद्दल काय वाटतं, ते आम्हाला नक्की कळवा. आमच्या लेखांबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आमचे तुम्हाला आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.