लग्नापूर्वीच हृता-प्रतीकचे रोमँटिक फोटो व्हायरल, साखरपुड्याचे अनसीन फोटो…

मित्रहो हल्ली अनेक मंडळी लग्नमंडपात हजर होत आहेत, खुपजण आपल्या विवाहाची जुळवाजुळव करत आहेत. सोशल मीडियावर अनेकांचे फोटो व्हायरल होत आहेत, त्यातच हृता आणि प्रतीकचा फोटो सुद्धा भलताच चर्चेत येत आहे. नुकताच त्या दोघांचा साखरपुडा पार पडला असून त्यांचे सर्व फोटो अनेकजण लाईक करत होते. त्या दोघांचेही अनेकजण चाहते आहेत, त्यांच्या फोटोची चर्चा त्यामुळे भलतीच रंगली होती.

आता हृताच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे आणि तिचा प्रियकर प्रतीकचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये ते दोघेही खूप रोमँटिक मूड मध्ये दिसून येत आहेत. त्यांचे फोटो कोणालाही सहज लाजवतील असेच आहेत, शिवाय हे नवे कपल कदाचित पुन्हा एकदा प्रेमात पडले असावे अशी चर्चा सुरू आहे.

View this post on Instagram

A post shared by Hruta (@hruta12)

२४ डिसेंबर रोजी या दोघांनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आपला साखरपुडा पार पाडला होता. हल्ली हृता ने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रतीक सोबतचे काही फोटो शेअर केले आहेत, हे अनसिन फोटो अनेकांना आवडले असून यावर खुपजनांच्या छान छान कमेंट येत आहेत. साखरपुड्याच्या वेळी सुद्धा तिने खूप छान फोटो शूट केले होते.

View this post on Instagram

A post shared by Prateek Shah (@prateekshah1)

शिवाय नुकताच व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सुद्धा त्या दोघांचा रोमँटिक अंदाज खूप भाव खाऊन जातो. हृता ही उत्तम अभिनेत्री असून तिने फुलपाखरू, दुर्वा, मन उडू उडू झालं या मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे. तसेच तिचा होणारा नवरा प्रतीक शहा हा लोकप्रिय दिग्दर्शक आहे.

View this post on Instagram

A post shared by Prateek Shah (@prateekshah1)

प्रतिकने आजवर बेहद २, बहु बेगम, कुछ रंग प्यार के ऐसें भी, ‘तेरी मेरी एक जिंदडी यांसारख्या प्रसिद्ध मालिकांचे दिग्दर्शन केले होते. या दोघांनाही त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. याआधी तुम्हाला हृता ही ‘फुलपाखरू’ या मालिकेत वेगळ्या रुपात दिसली होती आणि हृता तुम्हाला ‘मन उडू उडू झालाय’ या मालिकेत पाहायला मिळत असेल.

तरुण वर्गात मुलांची क्रश असणारी हृता लग्नबंधनात अडकणार म्हंटल्यावर सगळीकडे चर्चा सुरू झाली. तरुण वर्गातील चाहते नाराज झाले आहेत. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.