आर्चीचा नवा लुक, तुम्ही पाहिला का? पाहून तुम्हीही व्हाल सैराट..

“ए व्हय मागं, आलंय तोंडाला साबन लावून, चेन्नई एक्सप्रेस व्हय मागं” असे एकाहून एक कडक संवाद आणि त्याच ठसक्यात संवादफेक करणारी १४-१५ वर्षांची पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर उभी असलेली मुलगी, सैराटची (Sairat) अभिनेत्री रिंकू राजगुरू(Rinku Rajguru); आर्चीच्या भूमिकेमुळं तिला देशभरात लोकप्रियता मिळाली. तिला राष्ट्रीय पुरस्कारही (National award) मिळाला.  सैराट इतका जबरदस्त चालला की बॉलीवूडलाही (Bollywood) दखल घेणं भाग पडलं.

पहिलाच सिनेमा, रिंकुचा अभिनय अनुभवी व्यक्ती सारखा होता. या भूमिकेसाठी नागराज अण्णांनी ज्याप्रमाणे मार्गदर्शन केलं, तसेच कष्ट रिंकूने जीव तोडून घेतले. भूमिकेसाठी आवश्यक असणारे जे बदल तिने स्वतःमध्ये  करून घेतले. तिने वेगवेगळ्या वयोगटाची दिसण्यासाठी वजन वाढवलं होतं. या नंतर तिने सैराटचा कन्नड रिमेक ‘मनसू मल्लिगे’ (Manasu Mallige) मध्येही मुख्य भूमिका केली.


ती देशभरात प्रसिद्ध झाली आहे. पण पुन्हा एकदा रिंकूने स्वतःमध्ये बदल करून घेतले आहेत. तिने वजन खूप कमी केले आहे. ती अधिक फ्रेश आणि सुंदर दिसत आहे. ती बदलेल्या रुपातले आपले फोटो समाजमाध्यमांवर टाकत असते.

हे फोटो पाहून चाहत्यांचा हाल हा परश्यासारखा झाला आहे. कारण रिंकू आता पहिल्यापेक्षा जास्त सुंदर दिसायला लागली आहे. ती आता बारीक झाल्यामुळे अधिक तजेलदार आणि आ-क-र्षक दिसत आहे. यासाठी तिनं व्यायाम, योग्य आहार हे सगळं करणं ओघानं आलंच.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

या फोटोंमध्ये रिंकूच्या मनमोहक अदांनी चाहते घा-याळ झाले आहेत. कारण वेगवेगळ्या पोजमधले एकाहून एक मस्त फोटो इंस्टा, आणि फेसबूकवर पोस्ट होत असतात. खरंच कुणी तिच्या एका झलकसाठी तिच्या घराखाली खेट्या घालत असेल तर अतिशयोक्ती वाटू नये.

एकूण काय तर रिंकुच्या बदलेल्या अवतारामुळे तिच्या फॅन्सना एकच म्हणावसं वाटत आहे,
” याड लागलं गं, याड लागलं गं, रंगलं तुझ्यात, याड लागलं गं”

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.