सलमान आणि रणबीर यांनी कॅटरिनाला दिले सर्वात महागडे गिफ्ट, सर्वत्र होतीये चर्चा…

अलीकडेच अभिनेत्री कॅटरिना कैफ विकी कौशल यांचा विवाह संपन्न झाला. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी राजस्थान येथील सवाई माधोपुर समारोप वेळी एकमेकांचं स्वीकार केला. पण एक अशी वेळ होती जेव्हा विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्या लग्नाच्या अफवा पसरल्या होत्या असे न्यूज मीडियाच्या वृत्तपत्रावर सांगण्यात आले होते. पण ही बातमी आता खरी आहे हे चाहत्यांना देखील कळाले आहे. पण आता ही खरी बातमी कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरून दिली आहे सध्या त्यांनी त्याची लग्नामधील फोटोज त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट केले आहेत ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

या सगळ्या बरोबरच आणखी एका गोष्टीची चर्चा खूप जास्त प्रमाणात होत आहे ती म्हणजे अभिनेत्री कॅटरिना कैफ यांनी त्यांचा एक्स बोयफ्रेंड सलमान खान यांना त्यांच्या लग्नात निमंत्रित केले नव्हते. नुकताच एक बातमी पोचली आहेत ज्यामुळे सलमान खानची सगळीकडे वाहवा होत आहे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे चला तर मग ती गोष्ट कोणती आहे जाणून घेऊया…

लग्नानंतर लगेचच अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल हनिमूनला पोहोचले होते अलीकडेच ते परत आले आहेत. आता लवकरच ते मुंबईत फिल्मी जगतातील त्यांचे मित्र याच्यासाठी रिसेप्शन पार्टी देणार आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी नऊ तारखेला विवाह केला. या लग्नाच्या प्रत्येक बातमीबद्दल प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

पण सगळ्यांची नजर एकाच गोष्टीवर अडकून राहिली होती ती म्हणजे अभिनेता सलमान खान आणि अभिनेता रणबीर कपूर या लग्नात सामील होतील की नाही. पण सध्या एक वेगळीच बातमी सर्वत्र पसरत आहे ती म्हणजे जरी अभिनेता सलमान खान आणि रणवीर कपूर हे लग्नात आले नसले तरी त्यांनी गिफ्ट म्हणून खूप महागडे उपहार कॅटरिना साठी आणि विकीसाठी पाठवली आहेत.

अभिनेता सलमान खान यांनी कॅटरिना कैफ च्या लग्नात तीन करोड रुपयांची रेंज रोवर कार गिफ्ट केली आहे. प्रत्येक वेळी सलमान खान त्यांच्या मोठेपणा बाबत चर्चेत राहत असतात आता सुद्धा त्या गोष्टीमुळे सर्वत्र त्यांची चर्चा पसरली आहे या अगोदर अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि सलमान खान खूप जवळचे मित्र होते.

याचबरोबर सुप्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर यांनी देखील अभिनेत्री कॅटरिना कैफ यांना दोन कोटी ७० लाख रुपयांचा महागडा नेकलेस हिऱ्यांचा सेट गिफ्ट केला आहे. त्यामुळे सर्वत्र याचीच चर्चा होत आहे.