सलमान-जिनिलियाने केला भन्नाट डान्स! पनवेल फार्महाऊस वरचा व्हिडिओ झाला व्हायरल…

नुकताच २७ डिसेंबरला बॉलिवूडचा भाई सलमान खान याचा वाढदिवस झाला. आपला हा ५६ वा वाढदिवस त्याने मोजक्याच मंडळींसोबत साजरा केलेला पाहायला मिळत आहे. सलमानच्या वाढदिवसादिवशी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी सलमानला शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळत आहेत. दरम्यान, अभिनेत्री जिनिलिया डिसूझाने सलमान सोबतचा एक व्हिडिओ शेअर करत त्याला आपल्या स्टाईलने शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया वर बराच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

जिनिलियाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वर हा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने या व्हिडिओच्या निमित्ताने सलमान खानला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तिने कॅप्शन मध्ये लिहिले आहे, की “मोठ्या मनाच्या माणसाला खूप खूप शुभेच्छा! जगातील सर्व सुख तुला मिळो. आमचे तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. आज भाईचा बर्थडे.” या व्हिडिओला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया वर खूपच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओ मध्ये सलमान आणि जिनिलिया डान्स करताना दिसत आहेत. दोघांनीही एकाच रंगाचा टी-शर्ट घातला आहे. व्हिडिओ मध्ये दोघेही खूप धमाल करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सलमानच्या पनवेलच्या फार्महाऊस वरील असल्याचे बोलले जात आहे. तसेच या पार्टीला बाकी कलाकारही उपस्थित असल्याचे बोलले जात आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

नुकतीच सलमान खानच्या संदर्भातील बातमी आली होती. पनवेलच्या फार्महाऊसवर त्याला सर्पदंश झाल्याची ही बातमी होती. त्याला त्यामुळे रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर सलमानने मीडिया समोर गंमत करत ‘सापाने मला वाढदिवसाचे गिफ्ट दिले आहे’ असे सांगितले.

त्याने मीडिया समोर सांगितले, की “माझ्या फार्म हाऊस मध्ये साप घुसला होता. मी काठीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्याचवेळी तो साप माझ्या हाताजवळ आला. मी त्याला सोडण्यासाठी पकडले असता त्याने मला दंश केला. त्यानंतर तिथे गोंधळ झाला आणि पुन्हा एकदा मला सापाने दंश केला. असा त्याने मला तीन वेळा दंश केला. सापाने केलेलं हे कृत्य पाहता त्यानेच मला वाढदिवसाचं पहिलं गिफ्ट दिलं आहे.”

तुमच्या आवडत्या कलाकारांच्या बाबतीतले असेच काही अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया पेजेसना जरूर फॉलो करा. तसेच तुम्हाला आमचे आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका.