भाईजान होणार नवरदेव! मिळाली स्वप्नांतील ड्रीमगर्ल लवकरचं करणार सलमान खान लग्न..

सगळीकडे सध्या लग्नाचे हंगाम सुरू आहेत अनेक अभिनेते अभिनेत्री लग्नबंधनात अडकत असले तरी सगळ्याचं लक्ष सल्लू मिया यांच्याकडे लागलेलं असत हे नक्की. बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या लग्नाची आतुरता कित्येक वर्ष तरी फॅन्स वाट पाहत आहेत. स्वतः सलमान खान सगळ्यांना सिंगल असल्याचे भासवून देत असतो परंतु तो सिंगल नाही आहे याचा खुलासा स्वतः त्याने हल्लीच केला आहे. त्यामुळे सध्या चर्चेला उधाण फुटले आहे.

अलीकडेच झालेल्या बिग बॉस १५ च्या ग्रँड फिनाले वेळी त्यांनी हा खुलासा केला पहिल्यांदाच त्याने बिग बॉस १५ च्या ग्रँड फिनाले वेळी बिग बॉस १३ ची स्पर्धक शहनाज गिलसोबत हा किस्सा शेअर केला. या शोमध्ये शहनाज सलमान खान यांची गुपित ओपन करण्याची अतोनात प्रयन्त करत असते. व्हायरल व्हिडिओमध्ये शहनाज म्हणते की पंजाबच्या कॅटरिना कैफ पासून ती भारताची कॅटरिना कैफ झाली.

परंतु आता भारताची कॅटरिना कैफ आता पंजाबची कॅटरिना कैफ झाली आहे. शहनाजची ही गोष्ट सलमान ऐकतो आणि मग त्यावर म्हणतो की, हे अगदी बरोबर आहे! सगळे खुश आहेत. त्यावर सलमान खानला शहनाज गिल मंचावर म्हणते की सर तुम्ही फक्त खुश राहा म्हणजे झालं.

यानंतर शहनाज मंचावर बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांची माफी मागते. सॉरी मी जास्त बोलले नाही न..? यापुढे शहनाज म्हणते की सर तुम्ही सिंगल खूप चांगले दिसता. यावर सलमान खान व्यक्त होत म्हणतो की, हे चांगले आहे. एवढं बोलून गप्प बसते शहनाज कसली पुढे ती म्हणते की सर तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात का…? त्यावर सलमान खान म्हणतो की, हो मी रिलेशनशिपमध्ये आहे.

नॅशनल टीव्हीवर केलेल्या या खुलास्यामुळे चाहते आधी अवाक झाले. त्याने आपल्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केल्यामुळे आता तो लवकरचं लग्न बंधनात अडकेल अशी आशा आहे. आता सल्लू भाईच्या होणाऱ्या पत्नीचा चेहेरा पाहण्याची खूप जणांना उत्सुकता आहे. पण सलमान खान कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे हे मात्र अजून समजलेले नाही आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.