सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा आहे इतक्या संपत्तीचा मालक..सलमान दार महा देतो इतका पगार..

मित्रहो आपल्याला सर्वानाच बॉलिवूडशी जोडलेल्या सर्व घटनांचे, बातम्यांचे विशेष कौतुक असते. आपण खूपदा या क्षेत्रात असलेल्या व्यक्तींबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. खूपसे अभिनेता, अभिनेत्री इथे भरपूर प्रसिद्ध आहेत त्यामुळे त्यांच्या संपर्कात असलेली माणसे सुद्धा नेहमीच चर्चेत येत असतात. त्यातीलच आपण आज एका खास व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, ही व्यक्ती आहे सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांचा सिक्योरिटी शेरा. शेरा हा नेहमीच अनेकांच्या मनात स्वतःबद्दल कुतूहल निर्माण करत असतो. खूपसे लोक त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी भलतेच उत्सुक असतात.

शेरा आणि सलमान यांची भेट १९९५ मध्ये झाली होती, ज्यावेळी सलमान यांना एका बॉडीगार्डची खूप गरज होती. त्यावेळी अरबाज खान यांनी सलमान आणि शेरा यांची भेट करवून दिली होती. सलमान आणि शेरा यांची खूप छान मैत्री आहे, ते दोघे नेहमीच एकत्र दिसतात. शेरा अगदी सावली सारखा सलमान यांच्या सोबत असतो, त्याला अनेक कार्यक्रमात आपण सलमान सोबत पाहिले आहे. शेरा नेहमीच आपली ड्युटी अगदी व्यवस्थित करत असतो. सलमान यांची तो नेहमी सुरक्षा करत असतो.

View this post on Instagram

A post shared by Being Sheraa (@beingshera)

सलमान आपल्या “बॉडीगार्ड” चित्रपटाचे श्रेय आपला बॉडीगार्ड शेरा याला देतात, या चित्रपटाच्या अखेरीस शेरा सलमान यांच्या सोबत दिसला होता. शेरा म्हणजे जणू सलमान यांची सावली आहे, तो नेहमी त्यांच्या सोबत असतो तर त्यांना प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतो. तो नेहमी त्यांच्या सोबत असल्यामुळे त्याला अनेक लोक ओळखतात. सलमानचे अनेक चाहते शेराला ओळखतात, शिवाय त्याचेही अनेकजण चाहते आहेत. तो एक लोकप्रिय बॉडीगार्ड असून अनेकदा चर्चेत येत असतो.

गेल्या २६ वर्षांपासून शेरा सलमान यांना सिक्योरिटी देत आहे, त्याचे खरे नाव गुरमित सिंह जॉली असे असून तो मुंबई मध्ये राहतो. त्याचा जन्म मुंबई मधील एका सिख परिवारात झाला आहे. शेरा हा आधीपासूनच आपल्या बॉडीची बिल्डिंग जबरदस्त बनवत आला आहे, त्याला बॉडी बिल्डिंगचा खूप शॉक आहे. तो दिसायला सुद्धा अगदी दणकट आहे त्यामुळे एक बॉडीगार्ड म्हणून त्याची विशेष प्रसिद्धी झाली. त्याच्या या सुरक्षा रक्षकच्या कामासाठी सलमान त्याला वर्षाला २ करोड पेक्षाही अधिक रक्कम देतात.

View this post on Instagram

A post shared by Being Sheraa (@beingshera)

यानुसार शेरा प्रत्येक महिन्याला १६ लाख रुपये कमावतो, त्याने एक स्वतःची सिक्योरिटी एजन्सी बनवली आहे. जिथे बिझनेसमन आणि सिलेब्रिटी यांना सुरक्षा दिली जाते. आपल्या या सिक्योरिटी एजन्सीला शेराने आपल्या मुलाच्या नावावरून नाव ठेवले आहे, १८९३ मध्ये “टायगर सिक्योरिटी” म्हणून त्याने कंपनी स्थापन केली आहे. गेल्या वर्षीच शेराने सलमानच्या सांगण्यावरून विजक्राफ्ट नावाची इव्हेंट कंपनी सुद्धा स्थापन केली आहे. असे हे सलमान नेहमी आपला सिक्योरिटी शेरा सोबत दिसतात. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.