म्हणे, सलमान खानमुळे होईना झालंय सोनाक्षीचे लग्न, कारण जाणून तुम्हाला देखील बसेल धक्का..

‛थप्पड से डर नही लगता साहब, प्यार से लगता है’ हा डायलॉग ऐकल्यावर सगळ्यांना आठवणारी सोनाक्षी सिन्हाने बॉलीवूड विश्वात आपली ओळख निर्माण केली होती. बॉलीवूडच्या दबंग खान म्हणून ओळखला जाणारा सलमान खान, तर दबंग गर्ल म्हणून ओळखली जाणारी सोनाक्षी सिन्हा. शत्रूग्न सिन्हा यांची सोनाक्षी सिन्हा मुलगी आहे. तसेच, दबंग या सिनेमातून सोनाक्षी सिन्हा यांची सर्वांना ओळख झाली होती.

२००५ साली आलेल्या, मेरा दिल लेके देखो या चित्रपटापासून सोनाक्षीने डिझायनर म्हणून काम केले होते. यानंतर, दबंग चित्रपटातून शत्रूग्न सिन्हा यांच्या मुलीने म्हणजेच सोनाक्षी सिन्हाने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. अगदी आपल्या वडिलांप्रमानेच, सोनाक्षीने देखील ज्या पण क्षेत्रात एन्ट्री घेतली तिथे चांगलेच यश मिळवले.

सोनाक्षीने एसएनडीटीमधून फॅशन डिझाइनींगचा कोर्स केला आहे. सोनाक्षी सिन्हाने कधीच विचार केला नव्हता की, ती अभिनय क्षेत्रात प्रवेश करेल. मात्र, याचवेळी अभिनेता सलमान खान यांनी तिला चित्रपटसृष्टीत येण्यासाठी प्रवृत्त केले. यानंतर २०१० सालामध्ये दबंग या चित्रपटापासून बॉलीवूड क्षेत्रामध्ये अभिनेत्री म्हणून सोनाक्षी सिन्हाने पदार्पण केले होते.

शत्रूग्न सिन्हा हे उत्तम अभिनेता आणि राजकीय नेता देखील होते. त्यांनी जिवलग मित्र राजेश खन्ना यांच्याविरोधात निवडणुकीसाठी उभा राहून आपल्या राजकीय करिअरची सुरुवात केली होती. त्यांचा हा जीवन प्रवास नेहमीच यशस्वी ठरला आहे. शत्रुग्न सिन्हा यांनी अनेकवेळा बोलताना आपल्या मित्राच्या विरोधात निवडणुकीसाठी लढावे लागल्याची खंत व्यक्त केली आहे.

याव्यतिरिक्त शत्रूग्न सिन्हा यांना एक चिंता आहे. या चिंतेचा त्यांना सतत त्रास होत असतो. शत्रूग्न सिन्हा यांना आपल्या लाडक्या मुलीचे म्हणजेच सोनाक्षी सिन्हा बद्दल चिंता आहे. त्यांना सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाची चिंता आहे. प्रत्येक वडिलांप्रमाणे त्यांनाही आपल्या मुलीचे लग्न व्हावे ही चिंता त्यांना सतावत आहे. सोनाक्षी सिन्हा यांचे सध्याचे वय ३४ वर्ष आहे.

सोनाक्षी आणि बंटीच्या नात्याबद्दल चर्चा होत आहे. बऱ्याच पार्टीमध्ये आणि कार्यक्रमध्ये हे दोघे सोबत दिसत आहेत. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत, मग अजूनही इतके वर्ष होऊन देखील त्या दोघांनी लग्न का नाही केलं? तर याच कारण आहे सलमान खान. बंटी सलमानचा भाऊ सोहैलच्या बायकोचा भाऊ आहे. त्याचे, खान कुटुंबासोबत चांगले नाते आहे. बंटी आणि सलमान दोघेही चांगले मित्र आहेत आणि बंटीवर सलमानच्या विचारांचा चांगलाच पगडा आहे असे म्हणले जाते.

या कारणामुळे सोनाक्षी सिन्हाचे पीआर एजेंसी कॉर्नरस्टोनचा मालक बंटी सचदेवा सोबत सोनाक्षी सिन्हाच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. कदाचित त्यामुळेच बंटी देखील सोनाक्षी सोबत लग्नासाठी टाळाटाळ करत असावा असं देखील काही जणांचे मत आहे. मात्र, सोनाक्षी सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम करत आहे म्हणून देखील त्यांच्या लग्नाला उशीर होत आहे असं बोललं जात आहे.

दबंग या चित्रपटानंतर आपल्या दमदार अभिनयाने सोनाक्षीने लवकरच स्वतःची वेगळी जागा निर्माण केली. यानंतर सोनाक्षी सिन्हाने रणवीर सिंह, अक्षय कुमार, शाहिद कपूर, अजय देवगण अश्या अनेक अभिनेत्यांसोबत काम केले. अजय देवगनच्या भुज सिनेमामध्ये देखील सोनाक्षीची महत्वपूर्ण भूमिका असल्याचं सांगितलं जात आहे. सोनाक्षी सिन्हाने चित्रपटसृष्टीत चांगली छाप निर्माण केली आहे. तसेच, तिच्या लग्नाची गोड बातमी ऐकण्यासाठी चाहते वाट पाहत आहेत.