‘घटस्फोटित सेकंड हँड आयटम…’ म्हणणाऱ्या नेटकऱ्याला समंथाने सुनावले खडे बोल! ट्विट व्हायरल…

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू काही दिवसांपूर्वी बरीच चर्चेत होती. कारण होते ते तिचा घटस्फोट. दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य बरोबर तिने घटस्फोट घेतल्यानंतर दोघांच्याही चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली होती. त्यानंतर तिने नागा चैतन्य कडे ५० कोटी रुपयांची पोटगी मागितल्याचीही चर्चा होऊ लागली होती. मात्र त्यानंतर तिने ती नाकारल्याचीही बातमी समोर आली होती. एकंदर समंथा आपल्या खासगी आयुष्यामुळे खूपच चर्चेत राहिली होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

आता देखील ती पुन्हा चर्चेत आली आहे. मात्र याला कारण तिचे खासगी आयुष्य नसून तिचे नवीन काम आहे. नुकताच अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाचा ‘पुष्पा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यातील गाणी सध्या इंटरनेट वर बराच धुमाकूळ घालताना दिसत आहेत. या चित्रपटात एक आयटम सॉंग देखील आहे. याच आयटम सॉंग वर अभिनेत्री समंथाने डान्स केला आहे. विशेष म्हणजे हे तिचे पहिलेच आयटम सॉंग आहे.

सध्या तिचे हे गाणे सगळीकडे बरेच गाजत असले तरी काही लोक मात्र तिला बदनाम करण्याची संधी सोडत नाहीयेत. तिचे हे नवीन गाणे रिलीज झाल्यानंतर अलीकडेच एका नेटकऱ्याने तिच्याबद्दल वाईट शब्दांत ट्विट केले. यावर समंथाने त्या नेटकऱ्याला चांगलेच सुनावले असल्याचे दिसून येते. या नेटकऱ्याने समंथाला तिच्या घटस्फोटावरून ट्रोल केले आहे. त्याने ट्विट केले आहे, की “घटस्फोटित सेकंड हँड आयटम” आणि तिच्यावर त्याने ‘एका सज्जन व्यक्तीकडून ५० कोटी रुपये लुटल्याचा आरोप’ केला आहे. हा सज्जन व्यक्ती म्हणजे समंथाचा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्य आहे.

यावर समंथाने उत्तर देत त्या नेटकऱ्याला बुद्धी नसल्याचे म्हटले आहे आणि त्यावर ‘देवाचा आशीर्वाद कायम तुझ्याबरोबर असू दे’ असे म्हटले आहे. या ट्रोलिंग नंतर समंथाच्या चाहत्यांनी तिला पाठींबा दिला आहे. समंथाला या आधीही अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींवरून ट्रोल करण्यात आलं आहे. मात्र तिने नेहमीच या ट्रोलर्सना खरमरीत उत्तर देत गप्प केलं आहे.

दरम्यान, समंथाचे ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंटवा मवा उ उ अंटवा मवा’ हे पहिलेच आयटम सॉंग आहे. सध्या तिच्या चाहत्यांनी या गाण्याला पसंती दर्शवलेली दिसते. समंथाचे चाहते नेहमीच तिच्या बरोबर असतात. ते नेहमी तिच्या पाठीशी उभे असतात. या वेळीही ते तिच्या पाठीशी उभे राहिलेले दिसून आले.