फक्त आर्यन खानच नाही तर याही बॉलिवूड स्टार्ससाठीही डोकेदुकी ठरले आहेत समीर वानखेडे..३ नंबरच्या अभिनेत्रींसोबत तर

बॉलीवूड इंडस्ट्रीत सध्या जर कुणा एका नावाची भीती वाटत असेल तर ते म्हणजे समीर वानखेडे. समीर वानखेडे त्याच्या कणखर वृत्तीसाठी खूप प्रसिद्ध आहे. मात्र काही काळापासून तो बॉलिवूड स्टार्ससाठी मोठी समस्या बनला आहे. त्याने बॉलिवूड सेलिब्रिटींना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये अडकवले आहे.

कधी सेवाकर अधिकारी म्हणून, कधी ना र्को’टिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये काम करताना तर कधी कस्टम विभागाचा भाग बनून. समीर वानखेडेचा आणि बॉलिवूड स्टार्सचा जेव्हा सामना झाला आहे तेव्हा त्यांना नक्कीच अड’चणीत आणले आहे. समीरने आपल्या एका वक्तव्यात म्हंटले आहे की मी बॉलीवूडच्या वि’रो’धात नाही तर जे कायदा मोडतील त्यांच्या वि’रो’धात आहे. इंडस्ट्रीतील अशा ५ नावांबद्दल जाणून घेऊया ज्यांचा सामना समीर वानखेडेशी झाला आहे, जो सध्या एनसीबीच्या मुंबई विभागीय संचालक आहे.

शाहरुख खान: जुलै २०११ मध्ये, शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाला मुंबई विमानतळावर कस्टम टीमने रोखले होते. त्यावेळी शाहरुख हॉलंड आणि लंडनहून कुटुंबासह परत आला होता. त्याच्यावर जास्त सामान सोबत घेऊन गेल्याने त्याच्यावर दीड लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यावेळी समीर वानखेडे हा कस्टम विभागाच्या टीमचे नेतृत्व करत होता.

अनुष्का शर्मा: २०११ मध्ये अनुष्का शर्माला समीर वानखेडेने मुंबई विमानतळावर थांबवले होते आणि तिची तलाशी घेतली होती. समीर त्यावेळी सीमाशुल्क विभागात होता. त्याने अनुष्काला थांबवले कारण अभिनेत्रीकडे हिऱ्याचे ब्रे सलेट, नेक लेस, कानातल्या अंगठ्या आणि 2 मौल्यवान घड्याळे होती. चौकशी साठी अनुष्काला ११ तास थांबावे लागले होते.

रणबीर कपूर: २०१३ मध्ये रणबीर ब्रिटिश एअरवेजच्या फ्लाइटने लंडनहून मुंबईला परतला होता. यादरम्यान तो त्या मार्गावरून जात होता ज्यातून फक्त विमानतळ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जाण्याची परवानगी आहे. त्यांच्या बॅगेत एक लाखांहून अधिक किमतीचे सामान होते. रणबीरची ४० मिनिटे तालाशी घेण्यात आली होती. तेव्हा त्याला ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

दीपिका पदुकोण: सुशांत सिंग राजपूतच्या आ’त्मह’त्येनंतर दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांना एनसीबीने ड्र’ग्ज प्रकरणी बोलावले होते. ड्र’ग्ज प्रकरणात समीर वानखेडेने तिघांचीही चौकशी केली होती.

आर्यन खान :आर्यन खानचा ख टला सध्या सुरू असून या प्रकरणात शाहरुख खानच्या मुलाला अद्याप जामीन मिळालेला नाही. समीर वानखेडेच्या नेतृत्वाखाली एनसीबीने आर्यन खानला ड्र’ग्ज क्रूझ पार्टीदरम्यान २ ऑक्टोबरला पकडले होते. आर्यन काही दिवस एनसीबीच्या ताब्यात होता आणि आता तो मुंबईतील आर्थर रोड जे लमध्ये आहे.