सारा तेंडुलकर सिक्रेट रिलेशनशिपमध्ये? ‘या’ फोटोमुळे चर्चेला उधाण…

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नेहमीच आपल्या खेळामुळे चर्चेत राहिला आहे. आता त्याने खेळातून निवृत्ती स्वीकारली असली तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो बऱ्याचदा चर्चेत असलेला दिसत आहे. यावेळीही तो चर्चेत आहे तो त्याच्या मुलीमुळे. सचिनची मुलगी सारा तेंडुलकर देखील बरीच लोकप्रिय आहे. सोशल मीडिया वर ती बरीच सक्रीय असते. तिचे फॅनफॉलोईंग देखील जबरदस्त आहे. त्यामुळे तिच्या सगळ्याच फोटोजची चर्चा होताना दिसते.

आता देखील तिच्या एका फोटोची सोशल मीडिया वर बरीच चर्चा होताना दिसत आहे. साराने काही दिवसांपूर्वीच मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडिया वर खूप व्हायरल होताना दिसला. आता तिची लव्ह लाईफ चर्चेत असलेली दिसत आहे. काही दिवसांपूर्वी साराने आपल्या सुट्ट्यांचे फोटो सोशल मीडिया वर शेअर केले होते.

या फोटोमध्ये वरकरणी काही विशेष दिसत नसलं तरी या फोटोचा संबंध एका क्रिकेटर सोबत जोडला जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. साराने या व्हेकेशन ट्रिपचे फोटो शेअर केल्यानंतर तासाभरातच एका क्रिकेटरनेही आपल्या व्हेकेशन ट्रिपचा सिंगल फोटो सोशल मीडिया वर शेअर करत आपण सुट्टीवर असल्याचे जाहीर केले आहे. हा क्रिकेटर आहे शुभमन गिल. त्यामुळे आता सारा आणि शुभमन यांच्यात सिक्रेट रिलेशनशिप सुरू असल्याचे बोलले जात आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ꮪhubman Gill (@shubmangill)

शुभमन गिल शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएल टीममध्ये खेळताना दिसला आहे. अनेक वेळा शुभमन आणि साराच्या रिलेशनशिपच्या बातम्या येत राहतात. मात्र सारा किंवा शुभमन या दोघांनीही याबाबत कोणतेही विधान करणे टाळले आहे. मात्र या व्हेकेशन ट्रीपच्या फोटोंमुळे या चर्चेला पुन्हा उधाण आलेले पाहायला मिळत आहे. दोघांनीही एकाच दिवशी काही मिनिटांच्या अंतराने फोटो पोस्ट करणे हा केवळ योगायोग असू शकत नाही, असे नेटकऱ्यांचे म्हणणे पडले आहेत.

सारा तेंडुलकर इंस्टाग्रामवर खूप मोजक्या क्रिकेटर्सना फॉलो करताना दिसते. त्यापैकी एक क्रिकेटर शुभमन गिल आहे. शुभमनची बहीण शहनील गिल देखील साराच्या इंस्टाग्रामच्या फॉलो लिस्ट मध्ये दिसते. त्यामुळे सारा आणि शुभमनच्या डेटिंगच्या चर्चांना अजूनच पुष्टी मिळत आहे. याबाबत दोघांकडूनही कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही.

तुमच्या आवडत्या सेलिब्रेटींचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया हॅन्डल्सना नक्की फॉलो करा. तसेच तुम्हाला आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.