श्रीमंत असूनही कधीकाळी ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांच्यावरती आली होती दुसऱ्याच्या घरी धुनी भांडी करायची वेळ..

मित्रहो बॉलिवूड मधील अनेक अभिनेत्री नेहमी लोकप्रिय होत असतात, शिवाय काही ज्येष्ठ अभिनेत्री तर आजही चाहत्यांच्या पसंतीत गणल्या जातात. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे ७० च्या काळातील अभिनेत्री शशिकला. रसिक मंडळी आज सुद्धा तो ७० चा काळ आवर्जून पडद्यावर पाहत असतात. शशिकला यांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळपास १०० पेक्षा अधिक चित्रपटात काम केले आहे. अभिनय क्षेत्राचा श्वास असणाऱ्या शशिकला यांचे निधन ४ एप्रिल २०२१ मध्ये झाले होते.

त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से खूप रंजक आहेत, आजवर त्यांनी भरपूर भूमिका साकारल्या आहेत. त्यांची लोकप्रियता आणि प्रसिद्धी गगनाला भिडते. मात्र एकेकाळी त्यांची परिस्थिती खूप हलाखीची होती, एका मुलाखतीत सांगताना त्यांनी आपल्या एके काळातील आर्थिक संकटाविषयी बोलले होते. शशिकला यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील एका श्रीमंत कुटूंबात झाला होता. वडील मोठे व्यावसायिक असल्याने घरी परिस्थिती चांगली होती. पण शशिकला लहान असताना त्यांच्या कुटूंबावर आर्थिक संकट ओढवले होते.

पुढे मग त्यांच्या वडिलांनी मुंबईत आपला संसारगाडा आणला, मात्र इथे देखील काही फारसा फरक पडला नाही. शशिकला याबद्दल बोलतांना सांगत होत्या की “माझे वडील त्यांची सगळी कमाई त्यांच्या धाकट्या भावाला पाठवून द्यायचे. त्यावेळी तो लंडन मध्ये त्याच शिक्षण पूर्ण करत होता. आम्ही घरात सहा भावंडे होतो, पण माझ्या वडिलांनी नेहमी कुटूंबापूर्वी आपल्या भावाला प्रथम प्राधान्य दिले. मात्र एक वेळ अशी आली की माझ्या काकाला चांगली नोकरी मिळाली, आणि त्यांना आमच्या कुटूंबाचा विसर पडला.

माझ्या वडिलांच दिवाळ निघालं होत, तो काळ आमच्यासाठी खूपच कठीण होता. ” अस म्हणत शशिकला पुढे म्हणत होत्या की “एक वेळ अशी आली होती की आम्ही ८-८ दिवस उपाशी राहायचो, आणि कोणी तरी आम्हाला जेवायला बोलवेल या आशेवर असायचो. घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे मी घरकाम करायला सुरुवात केली होती. त्यावेळी माझी भेट अभिनेत्री नूरजहाँ यांच्या सोबत झाली. मी त्यांच्याकडे घरकाम करू लागले होते, माझ्यातील अभिनय गुण आवडल्यामुळे त्यांनी माझ्या विषयी त्यांच्या पतीला सांगितले.

विशेष म्हणजे त्यांच्या पतीमुळे मला १९५४ मध्ये “जिनत” चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी मला २५ रुपये मानधन मिळाले होते. इतकंच नाही तर या चित्रपटानंतर माझ्याकडे एकामागून एक चित्रपटांच्या रांगा लागल्या होत्या.” मित्रहो अभिनेत्री शशिकला यांनी आपल्या अतरंगी अभिनयातून अनेकांना आकर्षित केले आहे, आजही त्यांच्या चित्रपटांनी त्यांची आठवण ताजी ठेवली आहे आणि ती अशीच ताजी राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.