पहा या ५ सुप्रसिद्ध खेळाडूंच्या सुंदर गर्लफ्रेंड, दीपक चाहर पासून ते ईशान किशन पर्यंत सर्वजण रिलेशनमध्ये.

मित्रहो भारतात क्रिकेट म्हणलं की अनेक लोक एकत्र येतात आणि मग गप्पांचा एक निराळाच कट्टा तुडुंब भरतो. क्रिकेट हा खेळ संपूर्ण जगभर लोकप्रिय आहे शिवाय यातून अनेकांना पैसे सुद्धा भरपूर मिळतात. हा खेळ लोकप्रिय असल्याने यातील कलाकार देखील आपोआप लोकप्रिय होतातच. त्यामुळे सोशल मीडियावर सुद्धा या खेळाडूंची चर्चा असते, शिवाय त्यांचे चाहते नेहमी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. भारतातील अनेक खेळाडू जगभर लोकप्रिय आहेत, शिवाय त्यांच्या गर्लफ्रेंड सुद्धा सर्वत्र प्रसिद्ध आहेत.

आज आपण काही क्रिकेटर्स आणि त्यांच्या गर्लफ्रेंड बद्दल जाणून घेणार आहोत. मित्रहो मेगा ऑक्शन मध्ये १४ करोडोंमध्ये विकला जाणारा खेळाडू दीपक चाहर देखील खूप लोकप्रिय आहे. दिपकने आपल्या खेळाच्या कौशल्यातून अनेकांचे मन जिंकले आहे. त्याच्यासह त्याची गर्लफ्रेंड देखील अनेकांना आवडते, तिचे नाव जया भारद्वाज असे आहे. मागील वर्षी आयपीएल मॅच नंतर अगदी भर स्टेडियमवर दिपकने जयाला प्रपोज केले होते. जया ही एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करते, तसेच तिचा भाऊ सिद्धार्थ भारद्वाज हा बिग बॉसचा एक भाग राहिला आहे. जया आणि दीपक यावर्षी लवकरच लग्नबेडीत अडकतील अशी चर्चा आहे.

तसेच भारतीय टीमचा विकेटपट्टू ऋषभ पंत हा देखील प्रचंड लोकप्रिय आहे, त्याची गर्लफ्रेंड देखील अनेकांना माहिती आहे. ऋषभच्या गर्लफ्रेंडचे नाव इशा नेगी असे आहे. इशा आणि ऋषभ यांची जोडी तर सर्वत्र प्रसिद्धच आहे. हे दोघेही उत्तराखंडचे रहिवासी आहेत. डेहराडूनच्या कॉन्व्हेंट ऑफ जीसस अँड मैरी स्कुल मधून आपले सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर तिने एमिटी युनिव्हर्सिटी मधून बीए इंग्लिश ऑनर्स केले आहे. तसेच ती एक एन्टरप्रेनोर आणि इंटिरिअर डेकोर डिझाइनर आहे. इशाला फॅशन आणि डिझाइन मध्ये खुप जास्त आवड आहे.

मित्रहो आपला आणखीन एक खेळाडू प्रेमात वेडा आहे, तो म्हणजे पृथ्वीक शॉ होय जो सध्या प्राची सिंहला डेट करत आहे. पृथ्वीने २०१८ अंडर-१९ विश्वकप भारताला जिंकून दिले होते. तसेच त्याची गर्लफ्रेंड प्राची हीने उडान मालिकेतून प्रसिद्ध झाली आहे. पण मित्रहो प्राची आणि पृथ्वीक या दोघांनीही कधी आपल्या नात्याबद्दल बोलणे केले नाही, शिवाय त्यांना कधी एकत्र सुद्धा पाहण्यात आले नाही. सोशल मीडियावर या दोघांनी खूपदा एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत लक्ष वेधून घेतले आहे.

तसेच भारताचा आणखी एक खेळाडू ईशान किशन हा सुद्धा याबाबतीत विशेष चर्चेत आहे, त्याची गर्लफ्रेंड आदिती हुंडीया ही राजस्थानची आहे. तिने २०१६ मध्ये मिस राजस्थान या स्पर्धेत सहभाग घेतला होता, शिवाय यामध्ये ती दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली होती. २०१७ मध्ये तिने फेमिना मिस इंडिया राजस्थानचा ‘किताब पटकवला होता. तसेच यावर्षी ती एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडियाच्या टॉप १५ कंटेस्टंट मध्ये सहभागी होती. तिने २०१८ मध्ये मिस सुपरनेचुरलचा ‘किताब सुद्धा मिळवला होता. खूप दिवसापासून आदिती आणि ईशान एकमेकांना डेट करत आहेत.

या आयपीएल मधून चर्चेत आलेला राहुल चाहर देखील प्रसिद्ध आहे. खूप काळापासून तो आपल्या गर्लफ्रेंड इशानीला डेट करत आहे. क्रिकेट सोबतच राहुल सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असतो, त्याच्या अनेक पोस्ट नेहमीच व्हायरल होतात. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमी आपल्या गर्लफ्रेंड सोबतचे खूपसे फोटो तो शेअर करत असतो. त्याच्या बद्दल खास माहिती अशी की त्याने वयाच्या २० व्या वर्षी २०१९ मध्ये साखरपुडा केला होता. पण त्याच्या साखरपुड्या बद्दल जास्त काही माहिती सोशल मीडियावर व्हायरल नाही.

मित्रहो हे काही खेळाडू प्रेमात पडले आहेत, त्यांच्या गर्लफ्रेंड बद्दल आपण माहिती घेतलीच आहे शिवाय त्यांचे लवकर लग्न देखील होईल अशी आशा आहे. या सर्वानाच त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.