चक्क शाहरुख ने मारला शेन वॉर्नच्या बॉलिंग वर चौकार…सुनील गावस्करनी केला इशारा

सध्या सोशल मीडियावर शेन वॉर्नच्या निधनाच्या बातमीने सर्वांना दुःखी केले आहे. त्याचे चाहते त्याच्या आत्म्यास शांति लाभो यासाठी बरेच पोस्ट शेयर करत आहेत. दिग्गज कलाकार आणि क्रिकेटर्सदेखील त्यांच्यासोबतच्या आठवणी शेयर करून त्याला श्रध्दांजली वाहत आहेत.शेन वॉर्न हा स्पिनचा जादूगार म्हणून ओळखला जात होता. त्याच्या बॉलिंगचा सामना करताना अनेक दिग्गज बॅट्समनही काहीसे घाबरून जात.

आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रम रचणाऱ्या या महान क्रिकेटरचं शुक्रवारी निधन झालं. वॉर्नच्या निधनामुळे क्रिकेट विश्वाला तसेच सर्व क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. शेन वॉर्नने शुक्रवारी वयाच्या ५२ व्या वर्षी थायलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला.शेन वॉर्नचे शुक्रवारी निधन झालं. वॉर्नच्या निधनामुळे क्रिकेट विश्वाला तसेच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शेन वॉर्नचं हृदयविकाराच्या झटक्यामुळ निधन झालं.

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडबाहेर शनिवारी सकाळपासून चाहत्यांनी वॉर्नला श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ग्राउंडच्या बाहेरील वॉर्नच्या मोठ्या छायाचित्रासमोर चाहते बिअर, सिगारेट, पुष्पगुच्छ आणि फुलं अर्पण करत असल्याचं दिसत होतं. तसंच क्रिकेट क्षेत्रातल्या मंडळींनी शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहिली.

आता असाच एक व्हिडियो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्याने शेन वॉर्नच्या आठवणींचा एक किस्सा सर्वांसमोर आणला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत वॉर्न बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला बॉलिंग करताना दिसत आहे, तर दिग्गज क्रिकेटर सुनील गावस्कर अंपायरच्या भूमिकेत ग्राउंडच्या मध्यभागी उभे आहेत

.या व्हिडियोमध्ये शेन वॉर्न शाहरुख खानला बॉलिंग केल्यानंतर त्याने शेन वॉर्नच्या बॉलवर दणदणीत चौकार मारला आणि अंपायर सुनील गावस्कर यांनी त्याचा इशारा केल्याचे दिसत आहे. या दृष्यामुळे या व्हिडिओ ची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. आणि या व्हिडियो ला हजारोंच्या घरात लाइक्स आणि कॉमेंट्स मिळत आहेत. आणि सोबतच व्हिडियो पाहून सर्वजण शेन वॉर्नच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून प्रार्थना करत आहेत.

शेन वॉर्न सारखा महान क्रिकेटर पुन्हा होणे कठीणच आहे. कारण तो क्रिकेट जगतातील एक अतूट तारा होता. ज्याने आपल्या मेहनतीने अनेक विश्वविक्रम रचले आहेत. ज्याचे रेकॉर्ड तोडणे आजही कोणाला जमलेले नाही. त्याच्या आत्म्यास शांति लाभो हीच ईश्वचरणी प्रार्थना करुया…