“शक्तिमान” येणार पुन्हा भेटीस. पण किलविश, कपाला दिसतील का?..काय करतात सध्या हे कलाकार..जाणून घ्या.

मित्रहो दूरदर्शन वरील अनेक जुन्या मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत, या मालिकांनी लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत सर्वानाच आपली सवय लावली होती. त्यातीलच ९० च्या दशकातील एक मालिका म्हणजे “शक्तिमान” त्यावेळी रसिकांची विशेष प्रिय होती. या मालिकेतील सुपरहिरो लहान मुलांचा खुप आवडता होता, त्याने त्याकाळात अनेक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. मित्रहो या मालिकेच्या अनेक आठवणी आज पुन्हा एकदा ताज्या होत आहेत, या मागील कारण म्हणजे येणारा “शक्तिमान” हा नवा चित्रपट.

नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे , जो नेटकऱ्यांच्या मध्ये भलताच चर्चा रंगवत आहे. या “शक्तिमान” ची कथा काय असेल हे जाणून घेण्यासाठी अनेकजण खूप उत्सुक आहेत. खास म्हणजे या चित्रपटात बॉलिवूड मधील एक सुपरस्टार अभिनय साकारणार आहे, पण तो कोण हे अजून गुलदस्त्यात आहे. त्याचे नाव अद्याप जाहीर झाले नाही. पण त्यामुळे या चित्रपटाविषयी खुपजनांच्या उत्सुकता शिगेला पोहचत आहेत. मात्र मंडळी हा जरी नवा “शक्तिमान” असला तरीही त्या जुन्या “शक्तिमान” मधील कलाकार पुन्हा भेटीस येतील का असा अनेकांचा प्रश्न आहे.

जाणून घेऊया हे जुने कलाकार आता काय करतात. यातील एक कलाकार मुकेश खन्ना, त्यांचे पूर्ण नाव गंगाधर विद्याधर मायधर ओंकारनाथ शास्त्री असे आहे. त्यांनी मुख्य भूमिका “शक्तिमान”ही साकारली होती. अनेक बाल रसिक त्यांचे विशेष चाहते होते, ही मालिका २००५ मध्ये संपली होती. मात्र आजही या मालिकेचे अनेकजण चाहते आहेत.मुकेश यांचे आता वय साठी पार केले आहे. त्यांचे स्वतःचे एक युट्युब चॅनेल देखील आहे, त्यामुळे ते आजही खूप चर्चेत असतात.

तसेच यातील वैष्णवी महंत यांनी गीता विश्वासची भूमिका पार पाडली होती. या सुद्धा खूप लोकप्रिय आहेत.या मालिकेत त्या शक्तिमानच्या प्रेयसीच्या रुपात दिसल्या होत्या. त्यांची ही भूमिका विशेष प्रसिद्ध झाली आहे, शिवाय नंतर त्यांनी टशन-ए-इश्क आणि सपने सुहाने लडकपन के या मालिकेत काम केले होते. त्यांच्या या मालिका सुद्धा खूप लोकप्रिय झाल्या आहेत. तसेच २०१९ मध्ये त्या दोस्ती के साईड इफेक्ट्स या चित्रपटात दिसल्या होत्या.

“शक्तिमान” मध्ये ललित परीमु हे देखील खूप गाजले होते, त्यांनी डॉक्टर जैकालची भूमिका पार पाडली होती. त्यांची ही भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहे. या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. ललित यांनी आजवर अनेक छोट्या मोठ्या भूमिकेतून चित्रपटात काम केले आहे. तसेच गेल्या काही वर्षात ते सैफच्या “एजंट” चित्रपटात दिसले होते. अलीकडेच प्रदर्शित झालेला चित्रपट “कांचली” मध्ये सुद्धा ते झळकले होते.

तसेच “शक्तिमान” मध्ये आणखीन एक विशेष गाजलेली भूमिका आहे शलाका. या भूमिकेला अभिनेत्री अश्विनी काळसेकर यांनी साकारले होते. यामध्ये शलाका ही एक काळी मांजर असते, ही भूमिका लहान मुलांना खूपच आकर्षित करणारी होती. अश्विनी या नेहमीच निगेटिव्ह भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध होत्या, शिवाय आता त्या खूपशा चित्रपटातून रसिकांच्या भेटीस येत आहेत. अलीकडेच त्या सुभाष घई यांच्या “३६ फार्म हाऊस” या ओटीटीवर रिलीज चित्रपटात झळकल्या होत्या. तसेच त्याआधी त्या अक्षय कुमार यांच्या “लक्ष्मी” तसेच रणवीर सिंगच्या “सिम्बा” चित्रपटात सुद्धा दिसल्या होत्या.

तसेच आणखीन एक भूमिका म्हणजे तमराज किलविश, या भूमिकेला अभिनेता सुरेंद्र पाल यांनी साकारले होते. या मालिकेत त्यांनी अप्रतिम अभिनय केला होता, त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. शिवाय त्यांची टॅगलाईन “अंधेरा कायम रहेगा” ही आज सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. या मालिकेतून त्यांनी भरपूर लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली आहे. या मालिकेनंतर त्यांनी अनेक मालिकेत भूमिका निभावल्या आहेत. सध्या ते भोजपुरी चित्रपटात अधिक दिसतात.

तसेच मेजर जेजे यांची भूमिका सुद्धा खूप लोकप्रिय झाली होती, या भूमिकेला नवाब शाह यांनी साकारले होते. यामध्ये ते तमराज किलविश यांचे भक्त होते. त्यांनी आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. टायगर जिंदा है, दबंग ३, पानिपत, खुदा हाफिज यांसारख्या चित्रपटात ते झळकले आहेत. त्यांच्या खूपशा भूमिका नेहमीच चाहत्यांच्या भेटीस येत असतात.

अभिनेता फकिरा यांनी “शक्तिमान” मधील कपाला ची भूमिका पार पाडली होती. या भूमिकेने शक्तिमानला हैराण करून सोडले होते. हा तांत्रिक कपाला खुपच लक्षवेधी होता. मात्र सध्या तो कोणाच्याच नजरेत नसल्याने त्याच्याबद्दल माहिती उपलब्ध नाही.

तसेच “शक्तिमान” मधील न्यूज एडिटरच्या भूमिकेत राम सेठी दिसले होते, त्यांनी वृत्तपत्राच्या संपादकांची भूमिका पार पाडली होती. मित्रहो आता राम सेठी हे जवळपास ८३ वर्षाचे आहेत. ते वर्सोवा मुंबई मध्ये राहतात. विशेष म्हणजे या वयात देखील ते स्क्रीन प्ले, डायरेक्टर, कन्सल्टर म्हणून कार्यरत आहेत. अनेक लोक त्यांचे चाहते असून, त्यांची लोकप्रियता सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.

मित्रहो तुम्हाला आठवत असेलच “शक्तीमान” मध्ये एक नवरंगी चोर देखील होता. त्याची भूमिका किशोर भानुशाली यांनी साकारली होती. ही भूमिका सुद्धा खुप लोकप्रिय झाली होती. किशोर आता “भाभीजी घर पर है” या मालिकेत कार्यरत आहेत. त्यांची ही मालिका देखील खूप विनोदी असून, प्रेक्षकांना खूप आवडते. त्यांच्या या मालिकेतील भूमिकेचे देखील विशेष कौतुक होत असते.

तसेच “शक्तिमान” मध्ये आणखीन एक भूमिका महागुरू प्रेक्षकांना खूप आकर्षित करत होती. ही भूमिका टॉम ऑल्टर यांनी साकारली होती. मात्र टॉम आता आपल्यात नाहीत, २०१७ मध्ये त्यांना कॅन्सर झाला होता, २०१९ मध्ये त्यांचा “‘किताब” हा अखेरचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. मात्र आजवर त्यांनी निभावलेल्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या आहेत. एक कलाकार म्हणून त्यांनी नेहमीच आपली कला भूमिकेतून जपून ठेवली आहे.

तर मित्रहो या सर्व भूमिका आपली आवडती मालिका “शक्तिमान” मधील आहेत. या भूमिकांनी मालिकेला विशेष लोकप्रिय बनवलेले आहे, त्यामुळे येणारा चित्रपट “शक्तिमान” हा देखील रसिकांची उत्सुकता शिगेला पोहचवत आहे. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.