‘अशी ही बनवाबनवी’ मधील शंतनूची खऱ्या आयुष्यातील पत्नी त्याच्या मृ’त्यूनंतर ‘हे’ काम करून करते मुलांचा सांभाळ!

‘अशी ही बनवाबनवी’ (१९८८) या चित्रपटाने लोकप्रियतेचे सगळेच उच्चांक पार केले आहेत. यातील सगळेच कलाकार आजही लोकांच्या स्मरणात आहेत. जसा चित्रपट लोकांच्या कायमचा लक्षात राहिला, तसेच त्यातले सगळे कलाकारही लोकांच्या चांगलेच लक्षात राहिलेले आहेत. यातीलच एक व्यक्तिरेखा होती शंतनूची. धनंजय मानेचा लहान भाऊ आणि सुधाचा नवरा असलेला शंतनू साकारला होता अभिनेता सिद्धार्थ रे ने. सिद्धार्थला सुशांत या नावानेही ओळखले जायचे.

१९ जुलै १९६३ रोजी सिद्धार्थचा जन्म झाला. सिद्धार्थ प्रसिद्ध फिल्ममेकर व्ही. शांताराम यांचा नातू होता. सिद्धार्थने मराठीसह अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्येही कामे केली आहेत. ‘चानी’ या मराठी चित्रपटात बालकलाकाराची भूमिका निभावत सिद्धार्थने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. जैत रे जैत, थोडीसी बेवफाई (१९८०), वंश (१९९२), परवाने (१९९३), बाझिगर (१९९३) अशा हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये काम करत त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. ‘चरस’ (२००४) हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. २००४ मध्ये वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी या गुणी कलाकाराचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

१९९९ मध्ये सिद्धार्थने दाक्षिणात्य अभिनेत्री शांतिप्रिया सोबत लग्नगाठ बांधली. या दोघांना दोन मुले आहेत. सिद्धार्थ गेला तेव्हा त्यांच्या संसाराला केवळ ५ वर्षं झाली होती. दोन्ही मुले ४ वर्षांपेक्षाही लहान होती. अशावेळी शांतिप्रियाने आपले अभिनय क्षेत्रातले काम सुरू ठेवत आपल्या मुलांचा सांभाळ केला. शांतिप्रिया ही प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री भानुप्रियाची बहीण आहे.

शांतिप्रियाने तमिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटांसह काही कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे. तमिळ चित्रपटातून शांतिप्रियाने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. हिंदीमध्ये तिने सौगंध (१९९१), मेरे सजना साथ निभाना (१९९२), फूल और अंगार (१९९३), वीरता (१९९३), अंधा इंतकाम (१९९३), मेहेरबान (१९९३), इक्के पे इक्का (१९९४) अशा चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

शांतिप्रियाने छोट्या पडद्यावरही काम केले आहे. १९९५ मध्ये तिने ‘विश्वामित्र’ या हिंदी मालिकेत शकुंतलेची भूमिका साकारली होती. ‘आर्यमान- ब्रह्माण्ड का योद्धा’ (२००२) मध्ये तिने तेजी ही व्यक्तिरेखा साकारली होती. ‘माता की चौकी- कलियुग में भक्ति की शक्ति’ (२००८-२०११) मध्ये तिने माँ वैष्णोदेवी ची भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. ‘द्वारकाधीश- भगवान श्री कृष्ण’ (२०११-१२) या पौराणिक मालिकेत तिने देवकीची भूमिका साकारली होती.