कष्टाचेच फळ..! या मराठमोळ्या अभिनेत्याने केली आहे खूप मेहनत, आता आहे खूप मोठा..

मित्रहो काही तरी मिळवायचे म्हणल्यावर कष्ट हे करावेच लागतील, जेव्हा आपण कष्टाला पर्याय ठेवत नाही तेव्हा यशाला सुद्धा पर्याय उरत नाही. म्हणून कोणत्याही क्षेत्रात असो मेहनत करून पुढे वाटचाल करायची. आजवर अनेक अशी उदाहरणे आपल्या समोर आली आहेत ज्यांनी अफाट मेहनत आणि योग्य निर्णय यांच्या बळावर आज यशाचे शिखर गाठले आहे. तसेच कलाविश्वात येणाऱ्या अनेक कलाकारांची मेहनत आपण पाहिली आहे. आज आपण अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने हिंदी व मराठी कलाविश्वात अढळ स्थान निर्माण केले आहे.

मित्रहो या अभिनेत्याला आपण सर्वजण चांगलेच ओळखतो, हा अभिनेता दुसरा कोणी नसून शरद केळकर आहे. शरदने आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे पण एकेकाळी त्याला हे यश मिळवण्यासाठी अफाट मेहनत घ्यावी लागली होती. त्याने मनीष पॉलच्या प्रॉडकास्ट मध्ये आपल्या काही जुन्या दिवसातील आठवणींना उजाळा दिला होता. सोशल मीडियावर ही बाब वेगाने व्हायरल होत आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल जाणून घेताना अनेकांची उत्सुकता ताणली जात आहे.

तो आपल्या जुन्या आठवणी ताज्या करताना म्हणतो की “एक वेळ अशी आली होती की माझ्या बँकेच्या खात्यावर एक रुपयाही न्हवता. त्यात माझ्यावर क्रेडिट कार्डचे कर्ज होते. इतरांचेही पैसे द्यायचे होते. पण क्रेडिट कार्डमध्ये पैसे नसल्यामुळे ते सुद्धा बंद झालं होतं. लोकांना प्रसिद्ध व्यक्तींच्या प्रत्येक गोष्टीच कौतुक वाटत. पण त्यांच्या यशामागे त्यांनी केलेला संघर्ष नाही दिसत.” शरदने आपल्या परिस्थितीची जाणीव करून दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar)

मित्रहो शरदने आपल्या कलेच्या जोरावर या क्षेत्रात भरपूर यश मिळवले आहे, तो मूळचा मध्यप्रदेश येथील ग्वाल्हेरचा आहे. त्याचे संपूर्ण शिक्षण देखील ग्वाल्हेर मधेच झाले आहे. या कलाविश्वात येण्यापूर्वी शरद एक स्पोर्ट टीचर म्हणून कार्यरत होता. तिथे त्याचे जीवन सुरळीत होते, पण तरीही त्याला अभिनयाची खूप आवड होती. त्याने आपल्या कलेला वाव दिला, आपल्या कलेची जागृती केली. या क्षेत्रात त्याने आपले नशीब अजमवण्याचे ठरवले.

अखेर मेहनत घेऊन त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आणि इथे ते पाऊल रोवले सुद्धा. त्याचे हे पाऊल आता घट्ट रोवले गेले असून, या क्षेत्रात त्याची सर्वत्र खूप स्तुती होत आहे. अनेक लोक त्याचे चाहते आहेत, सोशल मीडियावर देखील तो खूप सक्रिय असतो. त्याच्या खूपशा पोस्ट तो शेअर करत असतो, त्यामुळे लाईक्स आणि कमेंट्सचा देखील वर्षाव होत असतो. त्याला असेच यश मिळत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.